जम्मू-काश्मीर : अनंतनाग येथील भाजपचे सरपंच रसूल डार आणि त्यांची पत्नी जवीरा यांची दहशतवाद्यांनी गोळ्या मारून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघेही रेडवानी कुलगाम येथील रहिवासी असून, सध्या ते अनंतनाग येथे भाड्याच्या घरात राहत होते.
हेही वाचा - अरे काय, डोसा बनवताय का? 10 मिनिटांत तीन विधेयके मंजूर केल्यावरून विरोधकांचा सवाल
जम्मू-काश्मीरचे भाजप नेते अल्ताफ ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे सरपंच रसूल डार आणि त्यांच्या पत्नी जवीरा यांची दहशतवाद्यांनी गोळ्या मारून हत्या केली आहे. जवीरा या कुलगाम भाजप किसान मोर्चाच्या अध्यक्षादेखील आहेत.
हेही वाचा - पेगासस हेरगिरी : एनएसओ ग्रुपशी कसलाही व्यवहार केला नसल्याचे सरकारचे स्पष्टीकरण