बिजिंग - तैवानमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का आज Earthquake In Taiwan बसला. 6.8 तीव्रतेचा भूकंप आग्नेय किनारपट्टीवरील तैतुंग शहराजवळ 7 किलोमीटर (4 मैल) अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाच्या धक्क्यात शेकडो लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तैवानच्या मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळ असलेली एक दोन मजली निवासी इमारत धराशायी झाली. राजधानी तैपेई येथील बेटाच्या उत्तर टोकाला याचे हादरे जाणवले. भूकंपाच्या या धक्क्यामुळे त्सुनामीचा धोका वर्तवण्यात आला आहे.
जपानी बेटांवर त्सुनामाचा अलर्ट - भूकंपाच्या या धक्क्यामुळे जपानी बेटांवर त्सुनामाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तैवानमधील भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने दक्षिणेकडील जपानी बेटांवर 1 मीटर (3 फूट) त्सुनामी येण्याची सूचना जारी केली आहे. भूकंपाच्या या धक्क्यात किती लोक मृत्युमुखी पडलेले याचा अधिकृत आकडा अद्याप आलेला नसला तरी शेकडो लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रविवारी बसले तीन धक्के - तैवानला शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा बसला होता. त्यामुळे येथील नागरिक आधीच हादरून गेले होते. त्यानंतर आत सकाळी 10 वाजेपासून तीन धक्के बसले. त्यातील दुसरा दुपारी 1 च्या सुमारास बसलेला धक्का सर्वात मोठा 6.8 रिश्टर स्केलचा होता. या भूकंपाच्या धक्क्याने मोठी प्राणहानी झाल्याचे म्हटले जात आहे.
चार देशांना मोठा फटका - तैवानला रविवारी 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरवले. या धक्क्याने भूकंपाचा केंद्र असलेल्या भागातील एक दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. या भूकंपामुळे तैवान, जपान, चीन आणि फिलिपाईन्स या देशांना मोठा फटका बसला आहे. भूकंपाची तीव्रता मोठी असल्याने प्राणहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्सुनामीच्या सुरुवातीच्या लाटा योनागुनी बेटावर पोहोचू शकतात. जपानच्या पश्चिमेकडील बेटावर, तैवानच्या पूर्वेला सुमारे 110 किलोमीटर (70 मैल) 4:10 वाजता. (0710 GMT) आणि त्यानंतर जवळची तीन बेटे यांना त्सुनामीच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. टोकियोच्या नैऋत्येस सुमारे 2,000 किलोमीटर (1,200 मैल) आहेत. हवामान अधिकाऱ्यांनी त्या भागातील रहिवाशांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तैवानच्या तैतुंग काउंटीला शनिवारी रात्री 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला आणि तेव्हापासून अनेक भूकंपांनी हादरले.