ETV Bharat / bharat

तालिबान विरोधात दंड थोपटणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांची मुलगी भारतात घेतेय शिक्षण - amrullah saleh daughter

अमरुल्लाह सालेह यांची 25 वर्षीय मुलगी सध्या दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेते आहेत. तीचे नाव खालिदा सालेह असे असून ती टि्वटरवर ती फ्रोहर सालेह या नावाने सक्रीय आहे. अफगाणिस्तान अमरुल्ला सालेह तालिबान्यांविरोधात ठाम उभे आहेत.

amrullah saleh daughter Khalida Saleh studied at Delhi University in india
तालिबान विरोधात दंड थोपटणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांची मुलगी भारतात घेतेय शिक्षण
author img

By

Published : Aug 29, 2021, 3:19 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तानावर ताबा मिळवला आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात भीतीचे वातावरण आहे. अनेक मंत्र्यांनी जीवाच्या भीतीने पलायन केले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह तालिबान्यांविरोधात ठाम उभे आहेत. तालिबान्यांविरोधात दंड थोपटणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांची मुलगी खालिदा सालेह भारतातीतल दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत आहे.

अमरुल्लाह सालेह यांच्या मुलीचे टि्वटरवर फ्रोहर सालेह नावाने खाते आहे. 24 ऑगस्ट रोजी फ्रोहर सालेहने टि्वट करून वडिलांसोबत बोलण झाल्याचे सांगितले होते. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात तिने दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तिने आपल्या वडिलांचे समर्थन केले असून पित्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. तसेच आम्ही तालिबानचा पराभव करू, असे तीने म्हटलं.

'तालिबान आणि पाकिस्तानच्या विरोधात घेतलेल्या आपल्या भूमिकेवर त्यांना अभिमान आहे. तसेच त्यांना संपूर्ण देशाचा अभिमान आहे. ते कधीही हार मानणार नाहीत. ते युद्धापासून कधीही मागे हटणार नाहीत. विजय आमचाच होईल', असे तीने काही दिवसांपूर्वी केलेल्या टि्वटमध्ये म्हटलं. तसेच #StandWithAfghans आणि #BeGoneTaliban हे हॅशटॅग वापरले.

अमरुल्लाह सालेह अफगाणचे 'कार्यवाहक राष्ट्रपती' -

काबूलमध्ये तालिबानी दाखल होताच, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आणि काही सहकाऱ्यांसोबत देशातून पळ काढला. यानंतर अफगाणिस्तानच्या घटनेनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत, पलायन, राजीनामा किंवा निधन झाल्यास उपराष्ट्रपती हे काळजीवाहू राष्ट्रपती बनतात. त्यानुसार अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला 'कार्यवाहक राष्ट्रपती' घोषित केले आहे. सध्या अफगाणिस्तानातील तालिबान्यांसाठी अभेद्य राहिलेल्या पंजशीर खोऱ्यात आहेत.

अफगाणिस्तानमध्ये अत्यंत भयावह स्थिती -

गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले. काबूल विमानतळावरील बॉम्बस्फोटात 100 हून अधिक जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. मृत्यूपेक्षा जास्त तालिबानची भीती नागरिकांमध्ये असून ते मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे.

हेही वाचा - 48 तासांच्या आत सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेने घेतला बदला; उडवली ISIS-K ची ठिकाणं

हेही वाचा - मृत्यूपेक्षा तालिबानची भीती अधिक; बॉम्बस्फोटानंतरही काबूल विमानतळाबाहेर लोकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.