ETV Bharat / bharat

MH KN Border Dispute: सीमावादात अमित शाह यांची मध्यस्थी, 14 डिसेंबरला दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

MH KN Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरु असलेल्या सीमावादात गृहमंत्री अमित शहा HM Amit Shah मध्यस्थी करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार Shah To Meet Maharashtra Karnataka CMs आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ही माहिती MP Amol Kolhe दिली. खासदारांचे शिष्ठमंडळ शाह यांना आज भेटले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खासदारांचे शिष्ठमंडळ शाह यांना आज भेटले
खासदारांचे शिष्ठमंडळ शाह यांना आज भेटले
author img

By

Published : Dec 9, 2022, 3:01 PM IST

Updated : Dec 9, 2022, 3:19 PM IST

नवी दिल्ली - MH KN Border Dispute: सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा HM Amit Shah मध्यस्थी करणार आहेत. शाह 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचीभेट घेणार आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे MP Amol Kolhe यांनी ही माहिती दिली. Shah To Meet Maharashtra Karnataka CMs

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्याबद्दल खासदारांच्या शिष्ठमंडळाने आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हे यांनी त्याबाबतची माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवावे. या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

दोन्ही राज्यांमधील सीमावादावर शांतता निर्माण करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी दिली. महाराष्ट्र विकास आघाडीच्या (एमव्हीए) खासदारांच्या शिष्टमंडळासह शहा यांची भेट घेतल्यानंतर शिरूरचे लोकसभा सदस्य कोल्हे पत्रकारांशी बोलत होते.

बैठकीदरम्यान, एमव्हीए शिष्टमंडळाने शाह यांना सांगितले की महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा विवाद अशा टप्प्यावर पोहोचला आहे की तो हिंसाचारात उफाळून येऊ शकतो. कोल्हे म्हणाले की, शाह यांनी 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली आहे.

Last Updated : Dec 9, 2022, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.