ETV Bharat / bharat

"तेव्हा दुसरा काही पर्यायच नव्हता", अमित शाहंच्या नेहरूंवरील टीकेला फारुख अब्दुल्लांचं उत्तर - अमित शाह नेहरू

Amit Shah PoK : गृहमंत्री अमित शाह यांनी पीओकेवरून पंडित नेहरूंवर केलेल्या टीकेला फारुख अब्दुल्ला यांनी उत्तर दिलं आहे. "तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता", असं ते म्हणाले. अन्यथा पूंछ गमवावं लागलं असतं असं ते म्हणाले.

Amit Shah
Amit Shah
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 10:33 PM IST

नवी दिल्ली Amit Shah PoK : गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना, पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे उद्भवला असल्याचा आरोप केला. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. शाह यांनी थेट असा आरोप केल्यानंतर काँग्रसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी त्यांना चर्चेचं आव्हान दिलं. अमित शाह यांनी देखील, सरकार या मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.

  • #WATCH | On Union HM Amit Shah's remark on Pandit Nehru, Former J&K CM and National Conference (NC) President Farooq Abdullah says, "...At that time, the army was diverted to save Poonch and Rajouri. If it had not been done, Poonch and Rajouri would have also gone to… pic.twitter.com/tjqx537TRw

    — ANI (@ANI) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फारुख अब्दुल्ला यांचं प्रत्युत्तर : आता अमित शाह यांच्या या टीकेला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिलंय. "काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात जायलं हवं, असं तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सुचवलं होतं", असं ते म्हणाले. "पुंछ आणि राजौरी भागाला वाचवण्यासाठी भारतीय सैन्याला आताच्या पीओकेमधून वळवण्यात आलं होतं. असं जर केलं नसतं, तर हे दोन भागही पाकिस्तानात गेले असते. यावर तेव्हा आणखी काही पर्याय नव्हता", असं फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलं.

  • #WATCH | Union HM Amit Shah speaks on The Jammu and Kashmir Reservation (Amendment) Bill, 2023 & The Jammu and Kashmir Reorganisation Bill, 2023

    He says, "...Earlier there were 37 seats in Jammu, now there are 43. Earlier there were 46 in Kashmir, now there are 47 and in PoK,… pic.twitter.com/hYrAEgarVa

पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ जागा राखीव : लोकसभेत बुधवारी (६ डिसेंबर) 'जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक' आणि 'जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक' या विधेयकांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी एक मोठी घोषणा केली. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ जागा राखीव ठेवल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांना जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी १ जागा आणि जम्मू-काश्मीरमधून देशभरात विस्थापित झालेल्या लोकांसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीर विधानसभेतील जागांचं पुनर्गठन : जम्मू-काश्मीर विधानसभेतील जागांचं पुनर्गठन करण्यात आलंय. जम्मूतील जागा ३७ वरून वाढून आता ४३ झाल्या आहेत. तर काश्मीरमधील जागा ४६ वरून वाढून ४७ केल्या गेल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पूर्वी १०७ जागा होत्या. आता त्यांची संख्या वाढून ती ११४ एवढी झाली आहे.

हे वाचलं का :

  1. "पाकव्याप्त काश्मीर नेहरूंची चूक, कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं", अमित शाह यांचा लोकसभेतच आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.