नवी दिल्ली - अग्निपथ योजनेच्या ( Agnipath Scheme Protest ) विरोधात संपूर्ण देशभरात हिंसक आंदोलन होत आहेत. दरम्यान, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत अग्निविरांना चार वर्षांच्या सेवेनंतर मंहिद्रा समुहामध्ये नोकरी करण्याची संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. 14 जूनला अग्निपथ योजनेची घोषणा झाली होती. त्यानंतर सतत हिंसक आंदोलन होत आहेत. आंदोलकाचे असे म्हणणे आहे की, या योजनेमुळे में पेंशन बंद करण्यात आली आहे. केवळा चार वर्षांची सेवा ही योग्य नाही. चार वर्षांनंतर जायच कुठं.?, असा प्रश्न सेनेत भरती होणाऱ्या युवकांनी उपस्थित केला आहे.
आनंद महिंद्रांची घोषणा - अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर ज्या प्रकारचा हिंसाचार होत आहे त्यामुळे मी दु:खी आणि निराश आहे, असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. मागील वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हणालो होतो की अग्निवीरला मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्याला उल्लेखनीयपणे रोजगारक्षम बनवतील. पुढे लिहिले होते की, महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना आमच्यासोबत भरती (नोकरी) करण्याची संधी देईल.
आनंद महिंद्रा यांना असेही विचारण्यात आले की ते अग्निवीरांना कंपनीत कोणते पद देणार? त्यावर लिहिले होते, 'नेतृत्वाचा दर्जा, सांघिक कार्य आणि शारीरिक प्रशिक्षणामुळे उद्योगाला अग्निवीरच्या रूपाने कुशल कर्मचारी मिळतील. हे लोक प्रशासन, पुरवठा व्यवस्थापनाची कामे कुठेही करू शकतात. बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी अनेक गाड्या पेटवल्या होत्या. एकट्या बिहारमध्ये रेल्वेचे तब्बल 700 कोटींचे नुकसान झाले आहे.
अग्निपथ योजनेच्या विरोधात लष्करात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी भारत बंदची हाक दिली आहे. विरोधकांनीही भारत बंदला मूकपणे पाठिंबा दिला आहे. आज भारत बंदला सामोरे जाण्यासाठी रेल्वेने तयारी केली आहे. आरपीएफ आणि जीआरपीला गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत बंद दरम्यान बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. भारत बंद दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये निदर्शने होण्याची शक्यता पाहता पोलीस प्रशासन सतर्क आहे. नोएडामध्ये कलम 144 लागू आहे. सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.