ETV Bharat / bharat

Amarnath Yatra Resumes : अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू, 4026 भाविक अमरनाथ गुहेकडे रवाना - अमरनाथ यात्रा

ढगफुटीमुळे 16 भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा ( Pilgrimage To Amarnaath ) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. चार हजारहून अधिक यात्रेकरु आज सकाळी पहलगामच्या नुनवान बेस कॅम्प कॅम्पमधून रवाना झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्तात हे भाविक रवाना झाले आहेत. दरम्यान, अमरनाथ गुहेकडून ( Amarnath Cave ) परतणारे भाविकही मोठ्या संख्येने जम्मूकडे रवाना झाले आहेत. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने यात्रेकरूंमध्ये मोठी उत्साह निर्माण झाला आहे. भाविकांनी तातडीने अमरनाथ यात्रा सुरू करणाऱ्या प्रशासनाचे कौतुक केले आहे.

Amarnath Yatra Resumes
अमरनाथ यात्रा सुरू
author img

By

Published : Jul 11, 2022, 2:20 PM IST

जम्मू - मागील दोन वर्षे अमरनाथ यात्रा ( Pilgrimage To Amarnaath ) कोरोनाच्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आली होती. यावर्षी मोठ्या उत्साहात भाविक यात्रेसाठी येऊ लागले होते. मात्र, शुक्रवारी अमरनाथ गुहेजवळ ( Amarnath Cave ) ढगफुटी झाल्यामुळे 30 जूनपासून सुरू झालेली ही अमरनाथ यात्रा ( Pilgrimage To Amarnaath ) थांबवण्यात आली होती. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दोन दिवस थांबविण्यात आलेली यात्रा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 4026 यात्रेकरू जम्मूवरून अमरनाथ यात्रेला रवाना झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्तात हे भाविक रवाना झाले आहेत.

4026 भाविक रवाना - "केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्तात येथील भगवती नगर यात्री निवास येथून 110 वाहनांमधून एकूण 4,026 यात्रेकरूंची 12वी तुकडी निघाली," असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भाविकांमध्ये ३ हजार १९२ पुरुष, ६४१ महिला, १३ मुले, १७४ साधू आणि सहा साध्वी आहेत. ते म्हणाले की बालटाल बेस कॅम्पला जाणारे 1,016 यात्रेकरू 35 वाहनांमधून पहाटे 3.30 वाजता निघाले होते. यानंतर 2,425 यात्रेकरूंना घेऊन 75 वाहनांचा दुसरा ताफा काश्मीरमधील पहलगाम कॅम्पसाठी रवाना झाला.

तात्पुरता जिना बांधला - लष्कराने पवित्र गुहेच्या बाहेर एक तात्पुरता जिना बांधला आहे. शुक्रवारी ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनामुळे गुहा मंदिराकडे जाणारा रस्ता खराब झाला होता. लष्कराच्या युनिट 'चिनार कॉर्प्स'ने ट्विट केले की, "पहलगाम येथून आज यात्रेला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पवित्र गुहेच्या बाहेर यात्रेकरूंसाठी रात्रभर तात्पुरता जिना बांधण्यात आला आहे." 43 दिवस चालणाऱ्या या वार्षिक यात्रेचा प्रारंभ 30 जून रोजी दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील पारंपारिक 48 किलोमीटर लांबीच्या नुनवान मार्गाने आणि मध्य काश्मीरच्या गंदरबलमधील 14 किलोमीटर लांबीच्या बालटाल मार्गाने झाला होता.

हेही वाचा - Shiv Sena support to BJP : खासदारांचे बंड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे देणार भाजपला पाठिंबा ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.