ETV Bharat / bharat

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेच्या मार्गात कोसळळी दरड , 53 वर्षीय अमरनाथ यात्रेकरु महिलेचा मृत्यू - अमरनाथ शिवलिंग

दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशात असलेल्या अमरनाथ गुहेच्या पवित्र शिवलिंगाचे शनिवारी 21 हजारहून अधिक लोकांनी दर्शन घेतले. या वर्षाच्या यात्रेच्या पहिल्या 15 दिवसात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. दरम्यान शनिवारी या यात्रेवेळी दरड कोसळल्याची घटना घडली यात एका 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

53 वर्षीय अमरनाथ यात्रेकरु महिलेचा मृत्यू

author img

By

Published : Jul 16, 2023, 11:55 AM IST

अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका महिला यात्रेकरूचा अपघाती मृत्यू झाला. तिचे वय 53 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान एका डोंगरावरील दरड कोसळली. यात ही यात्रेकरु महिला सापडल्याने तिचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान या प्रयत्नात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमचे अन्य दोन सदस्यही गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले.

पोलीस कर्मचारी जखमी : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत महिलेची ओळख पटली असून त्यांचे नाव उर्मिला बेन वय 53 असे आहे. ही दुर्घटना संगम टॉप आणि खालील गुहाच्या दरम्यान झाली. यादरम्यान ही महिला पवित्र गुहाकडे पायी प्रवास करत होती. पोलिसांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमचे दोन सदस्य, मोहम्मद सालेम आणि मोहम्मद यासीन हे देखील या घटनेत जखमी झाले आहेत. हे दोघेही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. घटनेनंतर जखमी पोलिसांना लष्कर आणि प्रवाशाच्या मदतीसाठी कर्तव्यावर तैनात असलेल्या खासगी हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले.

पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला शोक : अधिकाऱ्यांनी सांगितले की माहितीवरून पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी महिला प्रवाशाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबाप्रती सहानुभूतीही व्यक्त केली आहे. डीजीपीने दोन पोलिसांच्या कर्तव्याचे कौतुक केले आणि महिलेला आणि पोलिसांना त्वरीत बाहेर काढण्यासाठी ज्या लोकांना मदत केली त्यांचे सर्वांचे आभार देखील मानले. तसेच जवान लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यंदा अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू झाली. भगवान शिवाचे निवासस्थान मानली जाणाऱ्या अमरनाथ गुहेची 62 दिवसांची यात्रा 31 ऑगस्टला संपणार आहे.

हेही वाचा -

  1. Amarnath Guha Aarti : अमरनाथ गुहा मंदिरात पहाटेची आरती, पहा व्हिडिओ
  2. Amarnath Yatra 2023 : अमरनाथ भाविकांच्या पहिली तुकडी बालटालकडे रवाना; नायब राज्यपालांनी दाखवला हिरवा झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.