ETV Bharat / bharat

Allahabad University Professor : भगवान राम आणि कृष्ण यांना तुरुंगात पाठवलं असतं... अलाहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं वादग्रस्त विधान, गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 9:29 AM IST

Allahabad University Professor : अलाहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यापकानं सोशल मीडियावर हिंदूंच्या भावना दुखावणारी पोस्ट केलीय. प्रभू राम आणि श्रीकृष्ण यांच्यावर प्राध्यापकानं वादग्रस्त विधान केलंय. यामुळं लोक संतप्त झाले आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा समन्वयकाच्या तक्रारीवरून या विरुद्ध प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Allahabad University Professor
Allahabad University Professor

प्रयागराज Allahabad University Professor : पूर्वेकडील ऑक्सफर्ड विद्यापीठ म्हणून ओळखलं जाणारं अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठ सध्या प्राध्यापकांच्या वादग्रस्त विधानानं चागलंच चर्चेत आलंय. पाच दिवसांपूर्वी मंगळवारी विद्यापीठाच्या प्राध्यापकानं रस्त्यावर एका विद्यार्थ्याला काठीनं बेदम मारहाण केल्यानं देशभरात चर्चेचा विषय झाला होता. तर आता विद्यापीठाचे प्राध्यापक विक्रम हरिजन हे श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत आले आहेत. मात्र, विहिंपच्या जिल्हा संयोजकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ विक्रम हरिजन यांच्याविरुद्ध कलम 153 अ, 295 अ आणि 66 आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय.

वादग्रस्त पोस्ट काय : निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सनातन धर्म आणि हिंदू देवी-देवतांवर असभ्य आणि वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. पण, कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला तडा देणारा आणि देवी-देवतांचा अपमान करण्याचा प्रकार अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या प्राध्यापकानं केलाय. श्रीराम यांना हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात तर श्रीकृष्णाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं असतं, असं सोशल मीडियावर पोस्ट टाकून डॉ विक्रम हरिजन यांनी म्हटलंय. या प्राध्यापकानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, आज जर राम आणि कृष्ण हयात असते तर मी त्यांना योग्य आरोपाखाली तुरुंगात पाठवलं असतं.

  • यदि आज प्रभु श्री राम होते तो मैं ऋषि शम्भुक का वध करने के लिए उनको मैं आईपीसी की धारा 302 के तहत जेल भेजता और यदि आज कृष्णा होते तो महिलाओं के साथ सेक्सुअल हैरेसमेंट के केस के लिए उनको भी मैं जेल में भेजता ???

    — Professor Dr.Vikram (@ProfDrVikram1) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कर्नलगंज पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी : अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठचे सहाय्यक प्राध्यापक डॉ विक्रम हरिजन यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर भगवान राम आणि कृष्णाबाबत अशी अपमानजनक पोस्ट केलीय. त्यामुळं प्रयागराज शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी असोत किंवा सनातन धर्मावर श्रद्धा असलेले लोक असोत, शिक्षकाच्या वादग्रस्त वक्तव्यानं सगळेच दुखावले गेले आहेत. दिवसभरात केलेल्या या पोस्टबद्दल देशाच्या विविध भागातून लोकांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. त्याचवेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच अभाविपशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढू लागला. यानंतर विहिंपनं डॉ. विक्रम हरिजन यांच्या विरोधात कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून हिंदू देवतांचा अपमान आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तसंच समाजात वाद निर्माण करणाऱ्यांवर वक्तव्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी केली होती. यानंतर डॉ विक्रम हरिजन यांच्या विरोधात कर्नलगंज पोलीस ठाण्यात कलम 153 अ, 295 अ आणि 66 आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय.

गुन्हा दाखल होताच माफिनामा : आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच डॉ विक्रम हरिजन यांनी मुलांमध्ये विज्ञान आणि तर्कशुद्धता वाढवण्यासाठी अशी पोस्ट टाकल्याचं स्पष्ट केलंय. त्याच्या भावनिक पोस्टमुळं कोणी दुखावलं असेल तर त्याबद्दल माफी मागतो, असंही म्हटलं. पण, हे स्पष्टीकरण देऊनही त्यांनी आपली वादग्रस्त पोस्ट हटवली नाही. विशेष म्हणजे याआधीही याच प्राध्यापकानं शिव आणि शिवलिंगाबाबत अशी अशोभनीय टिप्पणी करून शिवभक्त दुखावले होते. श्रद्धेला ठेच पोहोचवणारी विधानं करण्यासोबतच डॉ. विक्रम हरिजन हे महिलांबद्दलही वादग्रस्त पोस्ट करत असतात.

हेही वाचा :

  1. Valgaon States Dispute: सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स; वलगावात नऊ जण गजाआड
  2. Controversy over documentary film kaali: डॉक्युमेंट्री फिल्म कालीच्या पोस्टरवरून वाद
  3. Arvind Kejriwal: धार्मिक भावना भडकवल्याबद्दल केजरीवालांविरोधात गुन्हा दाखल करा -इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.