नवी दिल्ली महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे सत्ता संघर्षावरील सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केली आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. यामुळे आता याबाबतची सुनावणी आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. ही सुनावणी 25 ऑगस्टला होणार आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी या दोघांनी बाजू मांडली, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली, याशिवाय निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांनी बाजू मांडली. यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हापासूनच सातत्याने हे प्रकरण पुढे ढकलले जात होते. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी आज तातडीने घेण्याची विनंती केली त्यामुळे त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी 24 तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर गेली. या सुनावणीबाबत अनिश्चितता होती. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नव्हते. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. अशातच वारंवार तारीख पुढे जात असल्याने सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केले होते. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली. त्यामुळे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी सत्तापेच कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शतारीख पे तारीखचे सत्र सुरु झाले आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का, या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल, राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी होणार आहे.
हेही वाचा Patra Chawl land case साक्षीदार स्वप्ना पाटकरांना ईडीचे चौकशीसाठी समन्स, आज बोलावले