लखनौ - तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारतामधून विविध लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. समाजवादी पक्षाच्या खासदारानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानला जाहीरपणे समर्थन दिले आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (AIMPLB) प्रवक्ता मौलाना प्रवक्ता सज्जाद नोमानी म्हणाले, की ''मी तालिबानला सलाम करतो. तालिबानने संपूर्ण जगात ताकदवान असलेल्या सैन्याला पराभूत केले. या तरुणांनी (तालिबानी दहशतवादी) अफगाणिस्तानच्या काबुलच्या जमिनीला स्पर्श केला आणि ईश्वराचे आभार मानले आहेत.''
हेही वाचा-संकटकाळात भारताचा मदतीचा हात... अफगाणिस्तानी नागरिकांकरिता आपत्कालीन ई-व्हिसा जाहीर
पुढे लॉ बोर्डाचे प्रवक्ता म्हणाले, की ''हत्यारे नसलेल्या समुदायाने जगातील सर्वात ताकदवान सैन्याला पराभूत केले आहे. ते (तालिबानी) काबुलमधील महालात दाखल झाले आहेत. महालात दाखल होण्याची त्यांची पद्धत सर्व जगाने पाहिली आहे. त्यांच्यामध्ये कोणताही गर्व आणि राग नव्हता. त्यांनी मोठ्या गोष्टी बोलून दाखविल्या नाहीत. अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदुस्थानी मुसलमान आपल्यालाला सलाम करत आहे. तुमच्या इच्छाशक्तीला सलाम करत आहे. तुमच्या उत्साहाला सलाम करत आहे''.
हेही वाचा-अफगाणिस्तानात भारताने केली आहे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, आता तालिबानी मांडताहेत उच्छाद
अफगाणिस्तानात पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती-
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन सुरक्षा परिषदेची 16 ऑगस्टला बैठक झाली. या परिषेदेचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की ''अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर नियंत्रण ठेवावे. विविध प्रातांमधून लोकांना स्थलांतरण करावे लागल्याने काबूलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे. सर्व पक्षांनी नियमांचे पालन करून नागरिकांच्या हितांचे संरक्षण करावे,'' अशी गटेर्रस यांनी विनंती केली आहे. अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती वाढत आहे. पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती आहे.
तालिबानला समर्थन देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, यापूर्वी समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी तालिबानला समर्थन देणारे वक्तव्य केले होते. बर्क म्हणाले होते, की ''तालिबानी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानींच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवे आहे. जेव्हा भारत हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आता तालिबान आपल्या देशासाठी स्वातंत्र्य आणि देश चालविण्याची इच्छा आहे''. या वक्तव्यानंतर शफीकुर रहमान बुर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा-अफगाणिस्तानातील भारतीय दुतावासातील कर्मचारी भारतात पोहोचले; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता -
अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या संघटनेच्या दहशतीमुळे नागरिक देश सोडण्याच्या तयारीत आहे. दोन दशकांपर्यंत चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेने आपले पूर्ण सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलावले. यानंतर तालिबानने या देशावर आपला ताबा मिळवला. बंडखोरांनी पूर्ण देशात परिस्थिती बिघडवून टाकली आहे.