नवी दिल्ली - भाजपाच्या माजी प्रवक्त्या शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्यावरती असलेले सर्व खटले दिल्लीत हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर नुपूर शर्मा यांच्यावरती देशभरात सर्व दाखल असलेले खटल्यांचा तपास दिल्ली पोलीस करणार ( all firs transfered to delhi against nupur sharma ) आहेत.
-
SC clubs & transfers all FIRs against Nupur Sharma over alleged hate statement on Prophet Mohammad, to Delhi
— ANI (@ANI) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File Pic) pic.twitter.com/F8bnEzdYBy
">SC clubs & transfers all FIRs against Nupur Sharma over alleged hate statement on Prophet Mohammad, to Delhi
— ANI (@ANI) August 10, 2022
(File Pic) pic.twitter.com/F8bnEzdYBySC clubs & transfers all FIRs against Nupur Sharma over alleged hate statement on Prophet Mohammad, to Delhi
— ANI (@ANI) August 10, 2022
(File Pic) pic.twitter.com/F8bnEzdYBy
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत एका टीव्ही शोवेळी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यानंतर नुपूर शर्मांविरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आसाम, दिल्ली, कर्नाटक या राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, अद्यापही याप्रकरणी तपास सुरु आहे, त्यामुळे त्यांना मिळालेला अंतरिम जामीन तसाच राहिल. भविष्यात नुपूर शर्मांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला तर, त्याचा तपास दिल्ली पोलीस करणार आहेत. त्याचवेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी नुपूर शर्मा दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
धोका लक्षात घेऊन न्यायालयाचा निर्णय - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याला अटक करु नये, असे त्यांनी याचिकेत म्हटलं होते. तसेच, माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून, बलात्काराच्या धमक्या मिळत आहे. त्यामुळे पहिल्यांदा दिल्लीत खटला दाखल झाला होता. त्यामुळे सर्व खटल्यांची सुनावणी दिल्लीत करण्यात यावी, असेही नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सांगितलं होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विनंती मान्य केली आहे.