लखनऊ Aligarh Crime News : रिक्षाचालकानं सावकाराच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलाला विकायला ( Father forced to sell his son ) काढल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मुलाला विकायचं असल्याचा फलक घेऊन हा पीडित रिक्षाचालक अलिगढमधील गांधी पार्क चौकात बसला होता. माझ्या मुलाला विकायचं असल्याची पाटी या रिक्षाचालकानं गळ्यात लटकावली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पीडित कुटुंबाला पोलीस ठाण्यात नेलं. त्यांना सावकारावर कारवाईचं आश्वासन देण्यात आलं आहे.
मुलगा विकण्याचं गळ्यात लटकावला फलक : अलिगढमधील गांधी पार्क चौकात पीडित कुटुंब गळ्यात मुलगा विकायचा असल्याचा फलक लटकवून बसलं. यातील पीडित वडील राजकुमार हे शहरात रिक्षा चालवतात. त्यांनी मुलगा विकायचा असल्याचा फलक गळ्यात लटकावल्यानं मोठी खळबळ उडाली. चौकात त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. नागरिकांनी पीडित राजकुमार याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
कर्जबाजारी राजकुमारला गुंडांची मारहाण : पीडित राजकुमार हे ई-रिक्षा चालवून आपला उदारनिर्वाह करतात. त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सावकाराकडून काही कर्ज घेतलं होतं. मात्र हे कर्ज वेळेवर परत करण्यास त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे राजकुमार यांना सावकाराच्या गुंडांनी जबर मारहाण केली. गुंडांनी राजकुमार यांचं सामान फेकून देत राजकुमार यांनाही घराबाहेर हाकलून लावलं. यासह त्यांची रिक्षाही पळवून नेली. त्यामुळे या गुंडांवर कारवाई करण्यासाठी राजकुमार हे महुआ खेडा पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. मात्र न्याय न मिळाल्यानं राजकुमार यांनी आपला मुलगा विकायला काढला आहे. आपल्या 11 वर्षाच्या मुलाला विकून सावकाराचं कर्जफेड करण्याचं राजकुमार यांनी ठरवलं आहे. मात्र गांधी पार्क पोलिसांनी त्यांना तत्काळ पोलीस ठाण्यात नेत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :