रायपूर - कोरोनाच्या या संकटात नाती पोरकी झाली आहेत. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला येत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, राजस्थानच्या कोटामध्ये माणुसकीचे दर्शन झाले. मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोलाना जंगलात झाडाखाली एक वृद्ध महिला उपाशी आणि तहानलेली आढळली. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच, ते महिलेला गावात घेऊन आले आणि महिलेचे प्राण वाचवले. संबंधित महिलेच्या दारूड्या मुलाने तीला जंगलात सोडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदानाच्या कोलाना ग्रामपंचायत क्षेत्रातील जंगलात एक 70 वर्षीय वृद्ध बेसहारा असल्याचे ग्रामस्थांना कळाले. हे कळताच स्थानिक ग्रामस्थ चैतमल गुर्जर यांनी काही लोकांसह जंगल गाठले आणि वृद्ध महिलेला पाणी दिले. चालू शकत नसल्याने महिलेने उचलून कोलाना चौकात आणले. त्यानंतर चौकशी करून तीला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
माणुसकी अजूनही जिवंत -
संबंधित महिला गेल्या दोन दिवसांपासून जंगलात होती. एकटीला मुलगा इथे सोडून गेला होता. तो परत घ्यायला येतो, असे म्हणाला होता. मात्र, आला नाही, असे महिलेने सांगितले. महिलेच्या मुलला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने आपल्या आईला जंगलात सोडल्याची माहिती आहे. मात्र, गावकऱ्यांनी महिलेचे प्राण वाचवून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिलं.