वॉशिंग्टन Alaska Airlines Emergency Landing : जपान एअरलाइन्सच्या विमान अपघातानंतर आणखी एक मोठा विमान अपघात टळलाय. अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग 737 विमानाची खिडकी अचानक उखडून खाली पडल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यानंतर अचानक विमानातील ऑक्सिजन मास्क जोरात खाली पडू लागले. अनेक प्रवाशांनी ऑक्सिजन मास्क घातले. वैमानिकानं तातडीनं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. यानंतर सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आलं. त्यामुळं विमानातील क्रू मेंबर्ससह सर्व 180 प्रवाशांचे प्राण वाचले.
उड्डाणानंतर लगेच झाला अपघात : पोर्टलँड, ओरेगॉन इथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाकडं उड्डाण केलेल्या अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइट 1282 ला शनिवारी टेकऑफ झाल्यानंतर लगेच हा अपघात झाला. हे विमान 174 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांसह विमान पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे परतल्याचं कंपनीनं निवेदनात म्हटलंय. हे विमान पोर्टलँडहून दुपारच्या सुमारास निघालं होतं. मात्र काही वेळातच त्याचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हा अपघात झाला तेव्हा हे विमान 16,000 फूट उंचीवर उडत होतं.
-
We are deeply sorry for the disruption the 737-9 MAX grounding has caused our guests. We expect the disruption to last through at least mid-week. For the very latest information visit: https://t.co/wVG6kzt4ru
— Alaska Airlines (@AlaskaAir) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are deeply sorry for the disruption the 737-9 MAX grounding has caused our guests. We expect the disruption to last through at least mid-week. For the very latest information visit: https://t.co/wVG6kzt4ru
— Alaska Airlines (@AlaskaAir) January 7, 2024We are deeply sorry for the disruption the 737-9 MAX grounding has caused our guests. We expect the disruption to last through at least mid-week. For the very latest information visit: https://t.co/wVG6kzt4ru
— Alaska Airlines (@AlaskaAir) January 7, 2024
आतापर्यंत 145 उड्डाणं : 11 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सेवेत दाखल झाल्यापासून या विमानानं 145 उड्डाणे केली आहेत. पोर्टलँडहून या विमानाचं दिवसाचं तिसरं उड्डाण होतं. हे विमान अमेरिकेत देशांतर्गत उड्डाणांमध्ये वारंवार वापरण्यात आले आहे. 2018 आणि 2019 मध्ये दोन मॅक्स 8 जेट विमानांची धडक झाली होती. यात 346 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर जगभरातील सर्व मॅक्स 8 आणि मॅक्स 9 विमानांवर जवळपास दोन वर्षे बंदी आणली होती.
अपघातानंतर डीजीसीएकडून अलर्ट : नागरी विमान उड्डाण संचालनालयानं DGCA) शनिवारी सर्व भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या बोईंग 737-8 मॅक्स विमानावरील आपत्कालीन दरवाजाची तपासणी करण्याचे निर्देश दिले. अमेरिकेत अलास्का एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. या घटनेनंतर अमेरिकेच्या बोईंग कंपनीनं आपल्या सर्व 65 बोईंग मॅक्स 9 विमानांना पुढील आदेश येईपर्यंत उड्डाण करण्यास बंदी घातलीय.
हेही वाचा :