वॉशिंगटन - ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी मंगळवारी (दि. 10 मे)रोजी सांगितले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा सुरू केले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट त्यांच्या काही ट्विटमुळे ब्लॉक करण्यात आले आहे. ( Twitter owner Elon Musk ) पण ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्कने सांगितले की, ट्विटर डील पूर्ण झाल्यावर ट्रम्प यांचे खाते रिस्टोअर केले जाईल. मस्क म्हणाले की, माझ्या मते हा नैतिकदृष्ट्या चुकीचा निर्णय आहे, काही प्रमाणात हा मूर्खपणाचा निर्णय आहे.
इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले असून ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातल्याने ट्विटरच्या विश्वासाला तडा जातो असही ते म्हटले आहेत. ( Alan Musk's announcement that Donald Trump's Twitter ) चुकीचे किंवा वाईट ट्विट असतील तर ते हटवावेत, तात्पुरते बंदी घालण्यात याव्यात, जो निर्णय योग्य आहे. पण त्यावर कायमची बंदी घालणे चुकीचे आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमचे बंद करणे मला योग्य वाटत नाही. मला वाटतं तो चुकीचा निर्णय होता, ट्विटरवरून त्यांचा आवाज कायमचा बंद करणे चुकीचे आहे असही ते म्हणाले आहेत.
इलॉन मस्कने ट्विटर ४४ बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले आहे. मात्र, ट्विटरवर बंदी घातल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, मी ट्विटरवर परतण्याच्या मनस्थितीत नाही आणि ट्विटरवर परत येण्याची इच्छाही नाही. माझे खाते पुन्हा सक्रिय झाले तरी मी तेथे परतणार नाही, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की ट्रम्प यांनी स्वतःचे सोशल मीडिया नेटवर्क ट्रुथ सोशल उघडले आहे, जिथे ते सक्रिय आहेत. मस्कने ट्रम्प यांच्या सांगण्यावरूनच ट्विटर विकत घेतल्याचेही वृत्त गेल्या आठवड्यात आले होते. मात्र, मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी याबाबत कोणतेही बोलणे झाले नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले होते.
हेही वाचा - भाजप पुढील 20-30 वर्षे सत्तेतून बाहेर जाईल याची शक्यता कमीच - प्रशांत किशोर