ETV Bharat / bharat

अभिनेता अक्षय कुमारचा रामदेव बाबांना पाठिंबा?

भिनेता अक्षय कुमारने अप्रत्यक्षरित्या रामदेव बाबांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसते. अक्षय कुमारने टि्वटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आयुर्वेद आणि भारतीय संस्कृतीमधील उपचारांना प्रोत्साहन देताना दिसत आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार
author img

By

Published : May 31, 2021, 11:00 PM IST

मुंबई - योगगुरू स्वामी रामदेव आणि आयएमए यांच्यात वाद वाढतच असल्याचे दिसत आहे. आयएमएने रामदेव बाबांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. तर रामदेव बाबाही माघार घेत नसून दररोज या प्रकरणात नवीन घडामोड होत आहे. यातच अभिनेता अक्षय कुमारने अप्रत्यक्षरित्या रामदेव बाबांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसते.

अभिनेता अक्षय कुमारचा व्हिडिओ...

अक्षय कुमारने टि्वटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आयुर्वेद आणि भारतीय संस्कृतीमधील उपचारांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अक्षय कुमारने एक अनुभव सांगितला आहे. तो एका आयुर्वेद केंद्रावर गेला असताना. त्या आयुर्वेद केंद्रात तो एकमेव भारतीय होता. तर इतर सर्वच परदेशी होते. आपले भारतीय उपचार घेण्यासाठी परदेशात जातात. मात्र, उपचार आपल्या आयुर्वेदमध्ये असतो, असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. अक्षयने बाबा रामदेव यांचे नाव घेतले नाही.

रामदेव बाबा आणि आयएमएमधील वाद -

रामदेव बाबा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. त्यानुसार आता त्यांनी अलोपॅथी डॉक्टर आणि कोरोना उपचारपद्धती विरोधात वादग्रस्त विधान करत मोठ्या वादाला सुरुवात केली. अलोपॅथी उपचार पद्धतीमुळेच आज लाखो लोकांचा जीव गेला आहे. अलोपॅथी हे मुर्ख सायन्स आहे. तर दोन लस घेऊनही 10 हजार डॉक्टर आणि एक लाख लोक दगावले आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबाने केले. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयएमएने तर रामदेव बाबावर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. तसे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबांना 15 दिवसांमध्ये माफी मागावी नाहीतर 1 हजार कोटींची दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी डॉ लेले यांनी दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात रामदेव बाबा विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.