ETV Bharat / bharat

UP Election 2022 : 'एक दुआ-सलाम तहज़ीब के नाम', अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने; कार्यकर्त्यांचा जल्लोष - अखिलेश यादव प्रियंका गांधी व्हिडिओ

बुलंदशहर मध्ये काल (गुरूवार) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची प्रचार रॅली होती. दरम्यान दोन्ही पक्षांची प्रचार रॅली एकमेकांसमोर आल्याने कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तर कार्यकर्त्यांनी हात हलवत घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला.

UP Election 2022
UP Election 2022
author img

By

Published : Feb 4, 2022, 9:46 AM IST

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) - निवडणुक प्रचारादरम्यान विरोधकांचा एकमेकांसमोर सामना झाला तर नारेबाजी, हुल्लडबाजी आणि कदाचित मारहाणीचेही प्रकार घडल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. अशावेळी उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळणे अपवादच. परंतु उत्तरप्रदेशातील बुलंदशहराने कौतुकास्पद राजकीय उदाहरण घालून दिले आहे आणि त्याला निमित्त ठरली अखिल यादव आणि प्रियंका गांधी यांची प्रचार रॅली...

अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने; कार्यकर्त्यांचा जल्लोष

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 10 तारखेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. बुलंदशहर मध्ये काल (गुरूवार) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची प्रचार रॅली होती. प्रियंका गांधी एका गाडीवरून नागरिकांना अभिवादन करत होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्तेही होते. दरम्यान समोरून अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आली. अखिलेश यांच्यासोबत जयंत चौधरी देखील होते. दोन्ही पक्षांची प्रचार रॅली एकमेकांसमोर आल्याने कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. प्रियंका यांनी हात दाखवत अखिलेश यांना अभिवादन केले, तर बसमध्ये असलेल्या अखिलेश आणि जयंत चौधरी यांनी देखील अभिवादन केले. त्यानंतर अखिलेश यांनी बसवर चढून प्रियंका गांधींना दाद दिली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तर कार्यकर्त्यांनी हात हलवत घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अखिलेश-प्रियंकाचे ट्विट -

बुलंदशहरमध्ये रॅली दरम्यान झालेल्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या कृतीचे कौतुक होत आहे. अखिलेश यादव यांनी 'एक दुआ-सलाम, तहज़ीब के नाम' असे ट्विट केले. तर प्रियंका गांधी यांनी देखील 'हमारी भी आपको राम राम' म्हणत ट्विट केले आहे.

यापूर्वी विमानात झाली होती भेट -

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी एकाच फ्लाइटने दिल्लीहून लखनौला येत होते. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, यावेळी अखिलेश आणि प्रियांका यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि एकमेकांची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटे चर्चाही झाली. ही बैठकही चर्चेचा विषय ठरली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.