ETV Bharat / bharat

Air Ticket Price Hiked : ऐन सणासुदीत विमानभाड्यात दरवाढीचं मोठं उड्डाण; अनेक मार्गांवर विमान प्रवास महागले - मुंबई

Air Ticket Price Hiked : ऐन सणासुदीत एसटी बस पाठोपाठ विमानाचंही भाड वाढलंय. त्यामुळं प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त झळ बसणार आहे.

Air Ticket Price Hiked
Air Ticket Price Hiked
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:02 AM IST

हैदराबाद Air Ticket Price Hiked : दरवर्षी दिवाळीत विमान, बसेसच्या तिकिटांचे दर वाढतात. मात्र, यंदा विमान भाडेवाढ दुपटीपेक्षाही अधिक वाढवण्यात आली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये दिवाळी, नाताळ यामुळं मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आल्या आहेत. यामुळं घरी येणारे तसंच बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. लवकर आणि आरामदायी प्रवासाचं साधन म्हणून अनेकजण विमान प्रवासाला पसंती देतात. याचाच फायदा घेत विमान कंपन्यांनी ऐन सणासुदीत तिकिटांचे दर वाढवले आहेत. त्यामुळं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मोठ्या प्रमाणात भाडेवाढ : दिवाळी कालावधीत राज्यात मुंबई-नागपूर व पुणे-नागपूर सर्वाधिक महागडा विमान प्रवास ठरण्याची शक्यता आहे. मुंबई-नागपूर प्रवासाचं 9 नोव्हेंबरचं तिकीट 10 हजार 800 रुपये आहे. मात्र शुक्रवार, १० नोव्हेंबर व शनिवार, ११ नोव्हेंबरच्या तिकीटांसाठी प्रवाशांना तब्बल 14 हजार 750 व 15 हजार 200 रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडं पुणे-नागपूर विमानाचं तिकीटही 8 व 9 नोव्हेंबरला 12 ते 14 हजार रुपयांदरम्यान आहे. मात्र 10 नोव्हेंबरला याच प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल 16 हजार 300 रुपये मोजावे लागणार आहेत.

कोणत्या मार्गावर भाडेवाढ :

  • मुंबई ते नागपूर
  • पुणे ते नागपूर
  • मुंबई ते चंडीगड
  • मुंबई ते श्रीनगर
  • मुंबई ते कोलकाता
  • मुंबई ते दिल्ली
  • मुंबई ते बंगळुरू
  • मुंबई ते कोची
  • मुंबई ते चेन्नई
  • मुंबई ते गोवा
  • मुंबई ते कोल्हापूर
  • मुंबई ते पाटणा

एसटीचीही भाडेवाढ : दिवाळी सणासुदीच्या हंगामात एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ होते. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळानं 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के भाडेवाढ जाहीर केलीय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की लगेच म्हणजे येत्या 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान एसटीनं 10 टक्के भाडेवाढ जाहीर केलीय. यामुळं ऐन सणासुदीत प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त झळ बसणार असल्याचं दिसतंय.

हेही वाचा :

  1. MSRTC fare hike : दिवाळीच्या तोंडावर एसटीची भाडेवाढ, ग्राहकांच्या खिशाला चाट लावून लालपरी मिळवणार 'बोनस'
  2. High Court Orders : हज यात्रेकरुंना विमान भाडे किती ते आधी सांगा, उच्च न्यायालयाचे आदेश
  3. Air India Urination Case : मुंबई -दिल्ली विमानात प्रवाशाने किळसवाण्याचा प्रकाराची हद्दच ओलांडली..विमातळावर झाली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.