अनेक अभ्यासानंतर हे आढळून आले आहे की, कोविड १९ झालेल्या लोकांवर हवेतल्या वाढणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम होतो. अमेरिकन थोरॅसिक सोसायटीच्या वार्षिक जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार कोविड साथीच्या रोगात प्रदूषणामुळे मृत्यू दर ८ टक्के वाढला आहे.
अमेरिकेच्या बोस्टनमधील बेथ इस्त्रायल डिकनॉस मेडिकल सेंटर येथील मेडिसिन विभागातील स्टीफन अँड्र्यू मेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रकाशित संशोधनाची तपासणी केली. यात कोविड १९ मुळे बिघडलेल्या तब्येतीचा संबंध वायू प्रदूषणाशी लावला होता. तसेच प्रदूषण, श्वसन विषाणू आणि आरोग्य विषमता यांचेही संबंध तपासले होते. त्यात त्यांना असे आढळून आले की, जगभरात कोविड १९ च्या मृत्यू दरात १५ टक्के वायू प्रदूषणाचा वाटा आहे.
वातानुकूलित वायू प्रदूषणाचा धोका, उद्योग, घरगुती, कार आणि ट्रकद्वारे उत्सर्जित होणारे लहान कण आणि विषारी वायू यासारखे हानिकारक प्रदूषण, यामुळे विषाणू श्वसन संसर्गाचे संक्रमण अधिक बिघडलेले आढळले.
" कोविड १९ या साथीच्या रोगाने सर्व देशभर असलेल्या वातावरणाच्या प्रदूषणाचा आरोग्यावर होणाऱ्या व्यापक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला आहे. ज्यात श्वसन रोगप्रतिकारक संरक्षण आणि तीव्र परिणामांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (एआरडीएस) होण्याचा धोका आहे. " मेन म्हणाले.
जे लोक हवेतल्या प्रदूषणाला जास्त वेळ सामोरी जातात, त्याचा तीव्र परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे कोविड १९ चा मृत्यूदरही वाढतो.
यापूर्वी जर्मन संशोधकांच्या नेतृत्वात झालेल्या अभ्यासात असे आढळले आहे की हवेतील नायट्रोजन डाय ऑक्साईडची पातळी वाढली असेल तर कोविड १९ मुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढते.
हावर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनातही असेच निरीक्षण समोर आले आहे. पीएम २.५ किंवा २.५ मायक्रोमीटरच्या कणांमध्ये वाढ झाली तर कोविड १९ मुळे होणारे मृत्यूही वाढतात.
अचूक यंत्रणा पूर्णपणे ज्ञात नसली तरी शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की वायू प्रदूषणाचा दीर्घकाळ होणारा संपर्क रोगप्रतिकारक यंत्रणा बिघडवू शकतो. यामुळे विषाणूची ग्रहणशीलता वाढते आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त वाढते.
हे हृदय रोग आणि मधुमेहामुळे बिघडलेली चयापचय क्रिया यांच्याशीही संबंधित आहे. यातही कोविड १९ मुळे गंभीर रोग आणि मृत्यूचा धोका आहे.
शाश्वत स्थानिक आणि राष्ट्रीय धोरणांद्वारे वायू प्रदूषणाच्या जागतिक समस्येवर लक्ष देण्याची तातडीची गरज असल्याचे या निष्कर्षात दिसून आले आहे. यामुळे जगभरात श्वसनाचे आरोग्य सुधारेल आणि समान न्याय मिळेल.