ETV Bharat / bharat

Air India Emergency Landing : उड्डाणानंतर एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद, आपत्कालीन परिस्थितीत जमिनीवर उतरविले विमान - Air India Emergency Landing

प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी बेंगळुरूला दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक संचालनालय ( Aviation regulator Directorate General ) या घटनेची चौकशी करत आहे. एअर इंडियाच्या A320 निओ विमानांमध्ये CFA च्या लीप इंजिन बसवलेले आहेत. A320neo विमानाच्या पायलटला सकाळी 9:43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याची ( technical problem in plane ) सूचना मिळाली.

Air India Emergency Landing
एअर इंडिया
author img

By

Published : May 20, 2022, 3:28 PM IST

नवी दिल्ली - टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियाचे A320 निओ ( An A320neo plane ) विमान उड्डाणानंतर अवघ्या 27 मिनिटांत मुंबई विमानतळावर ( emergency landing at Mumbai airport ) परतले. कारण तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे एक इंजिन हवेतच बंद झाले होते. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुरुवारी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी बेंगळुरूला दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक संचालनालय ( Aviation regulator Directorate General ) या घटनेची चौकशी करत आहे. एअर इंडियाच्या A320 निओ विमानांमध्ये CFA च्या लीप इंजिन बसवलेले आहेत. A320neo विमानाच्या पायलटला सकाळी 9:43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याची ( technical problem in plane ) सूचना मिळाली.

इंजिन बंद झाल्यानंतर सकाळी १०.१० वाजता विमान मुंबई विमानतळावर परत आल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याला ( Air India spokesperson ) विचारले असता ते म्हणाले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. आमचे विमान कर्मचारी अशी परिस्थिती हाताळण्यात कुशल आहेत. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल पथकांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने बेंगळुरूला पाठविण्यात आले.

हेही वाचा-सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यापीठाच्या आजी-माजी कुलगुरूंना बनावट प्रमाणपत्रप्रकरणी अटक

हेही वाचा-OMICRON BA4 : ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रवेश.. 'या' ठिकाणी आढळला पहिला रुग्ण

हेही वाचा-फाळणीत वेगळी झालेली मुमताज 75 वर्षांनी भेटली आपल्या भावांना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.