नवी दिल्ली Ahoi Ashtami 2023 : अध्यात्मिक गुरू आणि ज्योतिषी शिवकुमार शर्मा यांच्या मते, आज सकाळी 10:28 पर्यंत पुष्य नक्षत्र आहे. ज्यामुळं रवि पुष्य योग तयार होतो. या योगाला श्रीवत्स योग असंही म्हणतात. ज्योतिष शास्त्रातील 28 योगांपैकी दुपारी 13:35 पर्यंत शुभ योग होईल. त्यानंतर शुक्ल योग येईल, जो या व्रतासाठी अत्यंत लाभदायक आणि शुभ आहे.
अहोई अष्टमीला का करतात उपवास : माता आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हा उपवास करतात. या उपवासात माता फक्त पाणी पिऊ शकतात. इतर काही खाऊ शकत नाही. शास्त्रात याचा उल्लेख आहे.
या दिवशी चाकूचा वापर करु नये : अध्यात्मिक गुरू शिवकुमार शर्मा यांच्या मते, मातांनी या दिवशी कोणतीही फळे, भाजीपाला इत्यादी चाकूनं कापू नये, हे लक्षात ठेवावे. भाज्या उकळून तयार कराव्यात, असं केल्यानं मुलाला कोणताही त्रास होत नाही असं म्हणतात. आकाशात तारा उगवल्यावर माता आपले उपवास संपवतात. तर काही स्त्रिया चंद्र उगवल्यावर उपवास सोडतात. या दिवशी नक्षत्राचा उदय संध्याकाळी 6 च्या सुमारास होईल. तर चंद्रोदय 12:05 वाजता होईल.
भिंतीवर खडू आणि गेरूने अहोई मातेचे चित्र रेखाटण्याची परंपरा : शिवकुमार शर्मा यांच्या मते, अहोई अष्टमी व्रताच्या वेळी आई दीर्घायुष्यासाठी खडू आणि गेरूने भिंतीवर अहोई मातेचं चित्र रेखाटते. तिच्या मुलाचं आरोग्य चांगलं राहाव तसंच तो दिर्घायुषी व्हावा यासाठी त्याची पूजा करतात. घरी नैवैद्य तयार केलं जातं. माता आपल्या घरातील वृद्ध महिलांना, त्यांच्या सासू, वहिनी किंवा सासरे यांना अन्न व वस्त्र इत्यादी दान करतात. यामुळं त्यांना त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो. जे मुलाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हेही वाचा :