हैदराबाद : मराठा साम्राज्याच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स याने भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट असा अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांची न्यायदान, राज्यव्यवस्था आणि लडाऊ बाणा किती कणखर असेल याची प्रचिती येते. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी मल्हारपेठ येथे झाला होता. मात्र त्यांनी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे आपल्या साम्राज्याची राजधानी स्थापन केली. त्यामुळे देशभरात अहिल्याबाई होळकरांनी कार्य केले. जाणून घेऊ त्यांच्या कार्याची महती.
आठव्या वर्षी मल्हार होळकरांनी नेले सून म्हणून : अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी गावातील मल्हारपेठ येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना मल्हारराव होळकर यांनी एका मंदिरात पाहिले होते. त्यावेळी मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना आपला पूत्र खंडोजीराव यांच्यासाठी सून म्हणून नेले. त्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. अहिल्याबाई होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौढी गावाचे सरपंच होते. स्त्री शिक्षण प्रचलीत नसतानाही माणकोजी यांनी अहिल्याबाईंना लिहन्यावाचण्यास शिकवले होते.
खंडेराव होळकर कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी : मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना सून म्हणून नेल्यानंतर त्यांचा संसार सुखाने सुरू झाला. मात्र कुम्हेरच्या लढाईत 1754 ला धारातीर्थी पडले. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांना पती निधनाचे दुख पचवावे लागले. मात्र मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना सती जाऊ दिले नाही. त्यामुळे अहिल्याबाई होळकर जनसेवा करत राहिल्या.
मल्हारराव होळकरानंतर संभाळले राज्य : कुम्हेरच्या लढाईत अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर 12 वर्षानी त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे सासऱ्याच्या निधनानंतर अहिल्याबाई होळकर यांनी मराठा साम्राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. त्यांनी माळवा साम्राज्य फक्त सांभाळलेच नाही, तर ते वाढवून प्रजेची निगा राखण्याचे कामही केले.
नर्मदेतिरी अनेक मंदिरे, धर्मशाळा बांधल्या : अहिल्याबाई होळकर यांचा जन्म जरी महाराष्ट्रातील असला, तरी त्यांचे अधिक काम हे मध्य प्रदेशासह देशभरात आहे. अहिल्याबाईंनी नर्मदेतिरी अनेक धर्मशाळा आणि मंदिरे बांधली आहेत. अनेक विहिरींचे आधुनिक पद्धतीने बांधकाम केले आहे. त्यामुळे देशभरात त्यांनी बांधलेल्या विहिरी, बारवा, मंदिरे, आणि धर्मशाळा आजही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते.
हेही वाचा -