ETV Bharat / bharat

Agra Accident : मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर डॉक्टर पित्याचा काही वेळेतच रेल्वे रुळावर मृत्यू, नेमका अपघात कसा झाला?

Agra News : आग्रा येथे अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. आपल्या मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर डॉक्टर पित्याचा रेल्वे ट्रॅकमध्ये पाय अडकला. यावेळी अचानक समोरून एक ट्रेन आली अन् त्यांच्या अंगावरून गेली. डॉक्टरांच्या मृत्यूनं सर्वांना धक्का बसला.

After putting his daughter in the train in Agra surgeon leg got stuck in the track he died after being hit by the train
दुर्देवी! मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर पित्याचा अडकला रुळावर पाय, ट्रेन आली अन्....
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 1:54 PM IST

आग्रा Agra News : आग्रा शहरातील ज्येष्ठ लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंह गालव यांचे रविवारी सकाळी आग्रा येथे रेल्वे अपघातात निधन झाले. डॉ. लखन सिंह गालव हे आपल्या मुलीला सोडण्यासाठी राजा की मंडी स्टेशनवर गेले होते. तेथे रेल्वे रुळावर पाय अडकल्यानं ते रुळावर पडले अन् ट्रेन थेट त्यांच्या अंगावरून गेली. ट्रेनच्या धडकेनं त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली.

मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले : डॉ. लखन सिंह गालव हे शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ लॅप्रोस्कोपिक सर्जन होते. ते गैलाना रोडवरील अशोका हॉस्पिटलजवळ राहत होते. त्यांचे क्लिनिक आरबीएस डिग्री कॉलेज, बंगाली क्वार्टरजवळ कॉलनीत होते. ते एका खासगी रुग्णालयात सेवा देत होते. डॉ. लखन सिंह गालव यांची मुलगी केजीएमयू, लखनऊमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान डॉ. लखन सिंह गालव हे आपल्या मुलीला लखनौला जाण्यासाठी राजा की मंडी रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले होते. मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर त्यांचा पाय रेल्वे रुळावर अडकला. पाय अडकताच त्यांचा तोल गेला अन् ते खाली पडले. यादरम्यान त्यांना ट्रेनची धडक बसली. त्यामुळं त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबावर पसरली शोककळा : सदरील घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफसह रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. डॉ लखन सिंह गालव यांचा मृतदेह त्वरीत रेल्वे रुळावरून काढण्यात आला. यानंतर कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. डॉ. लखन सिंह गालव यांच्या मृत्यूमुळं त्यांच्या कुटुंबावर पसरली शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आग्राचे अनेक डॉक्टर घटनास्थळी पोहोचले. जीआरपीचे डॉ. लखन सिंह गालव यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आला आहे. डॉ. लखन सिंह गालव हे दिल्ली गेट येथील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात कार्यरत होते.

हेही वाचा -

  1. Fire Breaks in Pathankot Express : 'त्या' रेल्वे कर्मचाऱ्यामुळे पठाणकोट एक्सप्रेसमधील आगीची मोठी दुर्घटना टळली, जाणून घ्या सविस्तर
  2. Mumbai Agra Highway Accident: महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर भीषण अपघात; कंटेनरची वाहनांना धडक, दहा ठार
  3. Rape in Agra : भयंकर! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार; तक्रार केल्यानं गरम चिमट्यानं जाळले पीडितेचे हात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.