हैदराबाद - तेलंगणातही आंदोलनाच्या घटना समोर आल्या आहेत. आंदोलकांनी येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड केली. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जमलेल्या तरुणांनी एनडीए सरकारच्या विरोधात निदर्शने केली. जुन्या धर्तीवर भरती करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी हैदराबाद ते कोलकाता जाणाऱ्या ईस्ट कोस्ट ट्रेनला आग लावली. हिंसक आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापरही केला. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. आठ जणांना गोळ्या लागल्या आहेत. निर्मल असे मृताचे नाव सांगितले जात आहे.
हैदराबादमध्ये निदर्शने - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर, तेलंगणातील युवक सध्या आंदोलन करत आहेत. ज्यात त्यांनी हैदराबाद ते कोलकाता जाणाऱ्या ईस्ट कोस्ट ट्रेनच्या बोगी जाळल्या आहेत. रुळांवर आग लागल्याने रेल्वे पोलिसांनी काही आंदोलकांना अटक केली. मात्र, गर्दी वाढल्याने त्यांना परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही.
कंत्राटी पद्धतीला विरोध - अग्निपथ योजनेंतर्गत केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे नवे मॉडेल सुरू केले आहे. चार वर्षानंतर ७५ टक्के सैनिकांना निवृत्ती वेतनाचा लाभ न घेता निवृत्त व्हावे लागणार आहे. केवळ 25 टक्के अग्निवीरांना सशस्त्र दलात कायम ठेवले जाईल. यामुळे सैन्य भरतीची तयारी करणारे तरुण संतप्त झाले आहेत.
अल्पकालीन सेवेवर तरुण नाराज - सैन्य भरतीचे पारंपारिक मॉडेल आता अल्पकालीन सेवेने बदलले जाईल. सरकारच्या मते, यामुळे सशस्त्र दलांचे सरासरी वय कमी होईल आणि संरक्षण आधुनिकीकरणासाठी पुरेसा वाव राहून सरकारच्या पेन्शनवरील खर्चात घट होईल. दरम्यान, केंद्र सरकारने गुरूवारी रात्री अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी 2022 सालासाठी 21 वर्षांवरून 23 वर्षे करणार असल्याची घोषणा केली.