ETV Bharat / bharat

पंजाबपाठोपाठ छत्तीसगडमध्ये राजकीय भूकंप ? काँग्रेसचे 15 आमदार दिल्ली दौऱ्यावर! - छत्तीसगड काँग्रेस दिल्ली दौरा

छत्तीसगडच्या राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे 15 आमदार दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. हे आमदार काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे 15 आमदार दिल्ली दौऱ्यावर
काँग्रेसचे 15 आमदार दिल्ली दौऱ्यावर
author img

By

Published : Sep 29, 2021, 10:09 PM IST

Updated : Sep 29, 2021, 10:28 PM IST

रांची - पंजाबपाठोपाठ छत्तीसगडमध्येही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. छत्तीसगड काँग्रेसचे 15 आमदार दिल्लीला रवाना झाले आहेत. यामध्ये आमदार बृहस्पति सिंह यांचाही समावेश आहे. दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर हे सर्व आमदार दिल्लीमधील खासगी हॉटेलमध्ये थांबले आहेत.

छत्तीसगडमध्ये सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीमधील काँग्रेसचे आमदार हे छत्तीसगडचे काँग्रेस प्रभारी पीएल पुनिया यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. आमदार हे दिल्ली गेल्याबाबत विचारले असताना आमदार टी. एस. सिंहदेव म्हणाले, की छत्तीसगडमध्ये काय चर्चा सुरू आहे, हे सर्वांना माहित आहे. काँग्रेस हे खुले व्यासपीठ आहे. येथे लोकशाही आहे. काँग्रेसचे हायकमांड सर्वांना संधी देते.

काँग्रेस हे खुले व्यासपीठ

हेही वाचा-गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दहा नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश; कोलकात्यात ममता बॅनर्जींची घेतली भेट

हे आमदार दिल्लीला रवाना

  • यूडी मिंज
  • मोहित केरकेट्टा
  • रामकुमार सिंह यादव
  • बृहस्पति सिंह
  • गुलाब कमरो
  • चन्द्रदेव राय
  • पुरषोत्तम कंवर
  • द्वारिकाधीश यादव
  • प्रकाश नायक
  • गुरुदयाल बंजारे
  • विनय जायसवाल

हेही वाचा-पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता

छत्तीसगडमध्ये पंजाबसारखी स्थिती नाही, नेतृत्वातील बदलाचा प्रश्न नाही- बृहस्पती सिंह

छत्तीसगडचे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न नाही.

आमदार बृहस्पती सिंह म्हणाले, की 15 आमदारांसह दिल्लीला आलो आहोत. आम्ही राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आमच्या प्रभारींना भेटण्यासाठी आलो आहोत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न नाही. सर्व लोक समाधानी आहेत. एका व्यक्तीच्या समाधानासाठी निर्णय घेतला जाऊ शकत नाही. सर्वांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. मात्र, छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल आणि सिंहदेव यांची जोडी हिट आहे. ही जय-वीरुसारखी जोडी हिट आहे.

हेही वाचा-अमरिंदर सिंग-अमित शाह यांची दिल्लीत भेट; कॅप्टन म्हणाले, शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा!

Last Updated : Sep 29, 2021, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.