ETV Bharat / bharat

BJP MLA Resigned : भाजपला दुसरा धक्का, आमदाराने दिला राजीनामा, म्हणाले 'पक्षात योग्य वागणूक मिळत नाही' - प्रमेंद्र शेट भाजपात प्रवेश

भारतीय जनता पक्षाला गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) तोंडावर जोरदार झटका बसला आहे. भाजपा आमदार प्रवीण झांट्ये यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला ( BJP MLA Pravin Zantye Resigned ) आहे.

भाजप
भाजप
author img

By

Published : Jan 11, 2022, 2:11 AM IST

Updated : Jan 11, 2022, 2:26 AM IST

पणजी - गोव्यात विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) जवळ येत असताना भारतीय जनता पक्षात मात्र राजीनामासत्र सुरु झाले आहे. सोमवारी सकाळी राज्याचे मंत्री मायकल लोबो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा ( Michel Lobo Resigned from Goa BJP ) दिल्यानंतर, संध्याकाळी भाजपचे दुसरे आमदार प्रवीण झांट्ये यांनी अपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या सचिवाकडे जमा ( BJP MLA Pravin Zantye Resigned ) केला.

भाजप सोडणारे चौथे आमदार

मंत्री मायकल लोबो यांच्या पाठोपाठ मयेचे आमदार प्रवीण झांट्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. मयेमधून प्रेमेंद्र शेट ( Pramendra Shet Joined BJP ) यांना भाजपात प्रवेश दिल्यामुळे झांट्ये यांचा पत्ता कट झाला होता. झांट्ये हे मगोकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपा सोडणारे ते चौथे आमदार ठरले आहेत.

प्रवीण झांट्ये
प्रवीण झांट्ये

आपल्यावर अन्याय झाला : प्रवीण झांट्ये

आपल्याला स्वर्गीय मनोहर परिकर ( EX CM Manohar Parrikar ) यांनी पक्षात आणून मानाचे स्थान दिले. मात्र, त्यांच्या निधनानंतर पक्षात आपला योग्य वागणूक दिली जात नव्हती. तरीपण आपण भारतीय जनता पक्षाचे काम करत राहिलो. मात्र, आत्ता निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने आपल्याला बाजूला सारून नवे उमेदवार आयात केले आहेत. म्हणून आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात काँग्रेस - तृणमूल आघाडी नाहीच

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आघाडीची चर्चा होत आहे. मात्र, ही फक्त अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीबाबत नेते के सी वेणुगोपाल आणि पी चिदंबरम यांच्यासोबत सोमवारी रात्री उशिरा बैठक घेतली. त्यात काँग्रेस आणि तृणमूलच्या आघाडीबाबत सर्व अफवा असल्याचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

  • The rumour in circulation that a possible alliance with TMC was discussed by Congress leader Rahul Gandhi in today's meeting is completely baseless & untrue: Congress General Secretary (Organisation) KC Venugopal pic.twitter.com/ZV0OWBaEsw

    — ANI (@ANI) January 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jan 11, 2022, 2:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.