ETV Bharat / bharat

बिहारमधील गंगेनंतर मध्य प्रदेशमधील रुंझ नदीतही आढळले सहा मृतदेह - dead bodies in Pannas river

पन्ना जिल्ह्यातून केनची रुंझ ही उपनदी वाहते. या नदीच्या किनारी नंदनपूर गावाजवळ मृतदेहांचे ढीग असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक भयभीत झाले आहेत.

रुंझ नदीतही आढळले सहा मृतदेह
रुंझ नदीतही आढळले सहा मृतदेह
author img

By

Published : May 11, 2021, 10:30 PM IST

भोपाळ - संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे.पन्ना जिल्ह्यातील रुंझ नदी किनाऱ्याजवळ सहा मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट आहे.

पन्ना जिल्ह्यातून केनची रुंझ ही उपनदी वाहते. या नदीच्या किनारी नंदनपूर गावाजवळ मृतदेहांचे ढीग असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक भयभीत झाले आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार किनाऱ्यावर सहा जणांचे मृतदेह आढळले आहेत.

हेही वाचा-अरबी समुद्रात निर्माण होतंय चक्रीवादळ.. अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू-
गेली तीन ते चार दिवस मृतदेह असूनही कोणीही आलेले नाही. रुंझ नदी ही पन्ना जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. त्यामुळे मृतदेह पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांचे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक अधिकाऱ्याने आणखी दोन मृतदेह मिळाल्याचे सांगितले. मात्र, हे मृतदेह कोठून आले असावेत, हे माहित नसल्याचे सांगितले. त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-मृत्यूची ठरली अफवा! कोरोनातून बरे झाल्याने छोटा राजनची रुग्णालयातून सु्ट्टी

नुकतेच बक्सारमधील नदीमधील मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. तिथे ४० हून अधिक मृतदेह आढळले होते. अंतिमसंस्कार न झालेल्या कोरोनाबाधितांचे मृत्यू असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.