ETV Bharat / bharat

पँगाँगमधून चिनी सैनिक हटले, पण, धोका कायम - लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे - पँगाँग तलाव

गेल्या वर्षी मे महिन्यात दोन्ही देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर्वीच्या लडाखमधील भारताच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात चीनी सैनिक अद्याप आहेत, म्हणणे चुकीचे ठरेल, असे लष्कराचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह'मध्ये ते बोलत होते.

लष्कर प्रमुख  एम. एम. नरवणे
लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे
author img

By

Published : Mar 26, 2021, 10:04 AM IST

नवी दिल्ली - चीनशी झालेल्या करारानुसार पूर्व लडाखच्या पँगाँग तलाव परिसरातून सैन्याने माघार घेतली आहे. भारतासाठीचा धोका कमी झाला आहे. मात्र, अद्याप धोका संपला नसल्याचे लष्कराचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या वर्षी मे महिन्यात दोन्ही देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर्वीच्या लडाखमधील भारताच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात चीनी सैनिक अद्याप आहेत, म्हणणे चुकीचे ठरेल, असे नरवणे म्हणाले. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह'मध्ये ते बोलत होते.

चिनी सैनिक भारताच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात आले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का, या प्रश्नाला त्यांनी हो असे उत्तर दिले.

सीमेवर तणाव असून संघर्षाची परिस्थिती असल्याने परिसरात पेट्रोलिंग सुरू झाले नाही. अशी काही क्षेत्रे आहेत जिथं चर्चा करणे गरजेचे आहे. एकूण सीमेवरील संपूर्ण स्थिती पाहता आपला पाया मजबूत आहे आणि आपण आपल्या सर्व उद्देशांत यशस्वी होऊ, असेही ते म्हणाले.

एप्रिल 2020 पूर्वी भारताच्या अखत्यारीत असलेल्या भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. ते अद्याप तिथे आहेत का, असा सवाल त्यांना करण्यात आला. हे चुकीचे विधान असेल. अशी काही क्षेत्रे आहेत, जी कोणाच्याही नियंत्रणाखाली नाहीत. जेव्हा आपण त्यावर नियंत्रण करतो ते आपल्या ताब्यात असतात. आणि जेव्हा चीनकडून नियंत्रण मिळवलं जातं तेव्हा तो भाग चीनच्या ताब्यात असतो, असे त्यांनी सांगितले.

वादाचा मुद्दा हा 'ग्रे' झोन -

वास्तविक नियंत्रण रेषा निश्चित नसल्याने वादाचा मुद्दा हा 'ग्रे' झोनमुळे आहे. तेथे वेगवेगळे दावे आणि संकल्पना आहेत. आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहेत, हे सांगता येणार नाही. जोपर्यंत सैनिक मागच्या क्षेत्रातून मागे हटत नाही तोपर्यंत एलएसीवरील स्थिती सामान्य झाली असं म्हणता येणार नाही, असं लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.