ETV Bharat / bharat

Rijiju calls Indian judiciary most independent: भारतीय न्यायव्यवस्था सर्वात स्वतंत्र, सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर रिजीजू यांची स्पष्टोक्ती

author img

By

Published : Jul 25, 2022, 12:00 PM IST

रिजीजू यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. भारतीय न्यायाधीश आणि न्यायपालिका पूर्णपणे संरक्षित आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जगात कोणताही न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था भारतात आहे तितकी स्वतंत्र नाही. मीडिया ट्रायलवर जोरदारपणे बोलताना CJI रमणा म्हणाले होते की, माध्यमेच जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत जातात मात्र त्यांचे निष्कर्ष प्रकरणांचा निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक घटक असू शकत नाहीत.

भारतीय न्यायव्यवस्था सर्वात स्वतंत्र
भारतीय न्यायव्यवस्था सर्वात स्वतंत्र

नवी दिल्ली: सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर केंद्रिय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (CJI) रिजिजू यांनी सांगितले की, CJI रमणा यांनी इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाद्वारे मीडिया ट्रायलवर केलेल्या टिप्पण्या हे त्यांचे निरीक्षण आहे, भारत आणि जगभरातील परिस्थितीनुसार त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र मी त्यावर भाष्य करणार नाही.

न्यायपालिका पूर्णपणे संरक्षित - त्याचवेळी रिजीजू यांनी एक गोष्ट मात्र स्पष्ट केली. भारतीय न्यायाधीश आणि न्यायपालिका पूर्णपणे संरक्षित आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जगात कोणताही न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था भारतात आहे तितकी स्वतंत्र नाही. भारतातील न्याय वितरण प्रणालींविरुद्ध मीडिया ट्रायलवर जोरदारपणे बोलताना CJI रमणा म्हणाले होते की, माध्यमेच जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत जातात मात्र त्यांचे निष्कर्ष प्रकरणांचा निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक घटक असू शकत नाहीत. अलीकडे, आपण पाहतो की मीडिया कधीकधी जणूकाही प्रतिकोर्ट चालवताना दिसतात. मात्र हे अजेंडा-आधारित वादविवाद लोकशाहीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत.

पक्षपाती विचारांचा लोकांवर परिणाम - माध्यमांच्यावर टीका करताना रमणा म्हणाले होते की, माध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या पक्षपाती विचारांचा लोकांवर परिणाम होत आहे. लोकशाही कमकुवत होत आहे आणि व्यवस्थेला हानी पोहोचत आहे. या प्रक्रियेत न्याय वितरणावर विपरित परिणाम होतो. यातून माध्यमे लोकशाहीला दोन पावले मागे नेत आहेत. शनिवारी न्यायमूर्ती सत्य ब्रता सिन्हा यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात रमणा यांनी त्यांचे विचार मांडले होते. CJI रमणा यांनी नमूद केले की न्यायाधीशांवर प्रचंड दबाव आणण्यासाठी सोशल मीडियामध्ये “कांगारू न्यायालये” चालवली जात आहेत आणि त्याचा परिणाम न्यायालयीन व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर होतो.

सोशल मीडिया मोहिमेवर टीका - न्यायाधीशांविरुद्ध सोशल मीडिया मोहिमेवर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या न्यायमूर्तींच्या विरोधात एकत्रित मीडिया मोहिमेला दोष दिल्यानंतर, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी निदर्शनास आणून दिले की "जगातील कोणताही न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था भारतात आहे तितकी स्वतंत्र नाही."

हेही वाचा - आपचे खासदार संजय सिंह यांनी शेअर केला पंतप्रधान मोदींचा कोविंद यांच्या निरोपाचा वादग्रस्त व्हिडिओ, वर्मा यांनी घेतला समचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.