चेन्नई WTC Pont Table : भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात बांगलादेशसमोर 515 धावांचं मोठं लक्ष्य होतं. परंतु, खेळाच्या चौथ्या दिवशी ते दुसऱ्या डावात 234 धावांवरच मर्यादित राहिले. भारतीय संघाच्या या विजयामुळं 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. ज्यात भारतीय संघानं पहिल्या स्थानावर राहून आपलं स्थान मजबूत केलं आहे, तर बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
INDIA DEFEATED BANGLADESH IN FIRST TEST. 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) September 22, 2024
Rohit & his boys continues thier dominance. pic.twitter.com/SJbSfTKggT
भारत पहिल्या तर बांगलादेश सहाव्या स्थानावर : चेन्नई कसोटीत भारतीय संघाच्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेतील बदल पाहिल्यास, भारतीय संघ सध्या 71.67 गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 गुणांसह आहे. बांगलादेश संघाला चेन्नई कसोटी सामन्यातील पराभवाचा मोठा फटका बसला आहे, ज्यात ते आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत आणि त्यांच्या गुणांची टक्केवारी 39.29 आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी बांगलादेशचा संघ WTC च्या गुणतालिकेत इंग्लंड आणि श्रीलंकेच्या वर होता पण आता तो या दोघांच्याही खाली घसरला आहे.
भारताच्या विजयाचा इंग्लंड आणि श्रीलंकेला फायदा : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत भारतीय संघाच्या विजयामुळं, श्रीलंका संघ आता WTC 2023-25 च्या गुणतालिकेत 42.86 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड 42.19 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघ सध्या 50 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर शेवटचे तीन स्थान दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी व्यापलं आहे.
हेही वाचा :
- चेन्नई कसोटीत रविचंद्रन अश्विनचा डबल धमाका, भारतीय संघाचा मोठा विजय; बांगलादेशचं पाणीपत - India Beat Bangladesh
- चेन्नईच्या चेपॉकवर पदार्पणाच्या कसोटीतच युवा गोलंदाजाचा कहर... सामन्यात घेतल्या विक्रमी 16 विकेट - Chennai Test Record
- 'अरे इधर आएगा एक भाई...' स्वत: फलंदाजी करत असताना पंतनं सेट केली बांगलादेशची फिल्डींग, पाहा व्हिडिओ - Rishabh Pant Sets Fielding