ETV Bharat / bharat

African swine flu : केरळच्या कोट्टायममध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू तापाची नोंद, अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भारतात प्रथमच आढळून आल्याच्या काही महिन्यांनंतर, केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील (African swine flu reported in Keralas Kottayam) मीनाचिल पंचायतीच्या एका खाजगी शेतात आफ्रिकन स्वाइन फ्लू तापाची नोंद झाली, असे अधिकाऱ्यांनी (officials said) गुरुवारी सांगितले. African swine flu

African swine flu
आफ्रिकन स्वाइन फ्लू
author img

By

Published : Oct 29, 2022, 1:51 PM IST

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील (African swine flu reported in Keralas Kottayam) मीनाचिल पंचायतीच्या एका खाजगी शेतात आफ्रिकन स्वाइन फ्लू तापाची नोंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी (officials said) गुरुवारी सांगितले.

कोट्टायमचे जिल्हाधिकारी डॉ. पी. के. जयश्री म्हणाले की, जिल्ह्यात रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी पशुसंवर्धन अधिकार्‍यांना या रोगाची पुष्टी झालेल्या शेतातील डुकरांना ठार करून गाडण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत तब्बल 48 डुकरांना मारुन गाडण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

डुक्कर फार्मच्या आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर जिथे रोगाची पुष्टी झाली आहे, ते संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि दहा किलोमीटरचे क्षेत्र रोग निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे,' असे जिल्हाधिकाऱ्यांनी एका सरकारी प्रकाशनात नमूद केले आहे. बाधित भागात डुकरांचे मांस विक्री करणारी दुकाने बंद करणे आणि तेथून इतर भागात जाणारे डुकराचे मांस आणि चारा यांची वाहतूक थांबवणे, यासह अनेक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यातील काही शेतांमधून आफ्रिकन स्वाइन फ्लू तापाची नोंद झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.