ETV Bharat / bharat

मिझारोम : आफ्रिकी स्वाईन फ्लूने 9 हजार डुकरांचा मृत्यू - मिझारोम

मिझारोममधील डुकरांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लू आढळला आहे. आफ्रिकी स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 9,000 हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे. स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा या रोगाचा एक प्रकार आहे. हा सामान्यतः डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो.

आफ्रिकी स्वाईन फ्लू
आफ्रिकी स्वाईन फ्लू
author img

By

Published : Jul 5, 2021, 8:16 AM IST

आयझोल - भारतात कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. डुकरांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लू आढळला आहे. राज्यात आफ्रिकी स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 9,000 हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लूचा प्रसार झाला आहे. राज्य पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.

सध्या किमान दहा जिल्ह्यातील 152 गावे किंवा स्थानिक भागात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 36.38 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आफ्रिकन स्वाईन फिव्हर ग्रस्त भागाबाहेर 699 डुकरांचे 'असामान्य मृत्यू' देखील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत 1,078 डुकरांना मारण्यात आले आहे. स्वाईन फ्लूमुळे पहिल्या डुकरांचा मृत्यू 21 मार्च रोजी दक्षिणी मिझोरममधील लुंगलेई जिल्ह्यातील लुंगसेन गावात झाला होता. गेल्यावर्षी आसामच्या 306 गावांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लूमुळे 2 हजार 500 डुकरांचा मृत्यू झाला होता.

आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे. राज्य विभागाच्या 2019 च्या जनगणनेनुसार आसाममधील डुकरांची संख्या 21 लाख होती, परंतु अलिकडच्या काळात ती 30 लाखांवर गेली आहे. स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा या रोगाचा एक प्रकार आहे. हा सामान्यतः डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे. अर्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

हेही वाचा - ...म्हणून चीन भारतातून डुकराचे मांस आयातीवर घालणार बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.