ETV Bharat / bharat

गेल्या पाच वर्षात 170 आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी - असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स

2016 ते 2020 या 5 वर्षांच्या तब्बल 170 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालामधून समोर आली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स
author img

By

Published : Mar 12, 2021, 8:41 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेसला लागलेली गळती नवी नाही. मात्र या गळतीवर नजर टाकली तर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असलेले आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज मंडळीनी काँग्रेसची साथ सोडली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर याची सुरुवात झाली. ही गळती अजूनही थांबल्याचे दिसत नाही. 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या तब्बल 170 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालामधून समोर आली आहे.

काँग्रेसच्या तुलनेत भाजपामधून मात्र फक्त 18 आमदारांनी बाहेरची वाट धरली आहे. 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये 405 आमदारांनी निवडणूक लढवल्या. यात 182 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर 38 आमदारांनी काँग्रेस आणि 25 आमदारांनी तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाची वाट धरली. याचबरोबर 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या 5 आमदारांनी सोडचिठ्ठी दिली. तर काँग्रेसच्या 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला.

आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या ५ राज्यांमध्ये सत्ताबदल झाला. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर मध्यप्रदेशातील सरकार अखेर कोसळले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. कर्नाटकात काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसला हटवत भाजपा सत्तेत आली.

हेही वाचा - 'आपल्या मागण्यांवर ठाम रहा'; राकेश टिकैत यांचे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.