पणजी - राजकारणात पैसा आणि मसल पॉवरची भूमिका वाढत चालली आहे. गोव्यातही ती आहेच, 40 विधानसभा मतदारसंघात (In Goa with 40 assembly seats) निवडणूक लढवलेल्या 301 उमेदवारांपैकी 62 टक्के उमेदवार करोडपती (62 per cent crorepati candidates) होते हे यावरून स्पष्ट होते. गोवा विधानसभा निकालानंतर आज ADR रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रातल्या माहितीवरून हा रिपोर्ट काढण्यात आला आहे. गोवा विधानसभा 2022 मध्ये जिंकलेल्या 40 पैकी तब्बल 39 उमेदवार हे करोडपती असल्याची (crorepati winning candidates in goa) माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे.
40 जागांच्या गोवा विधानसभेचा निकाल लागला आहे. यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, या 40 जागांपैकी तब्बल 39 उमेदवार हे करोडपती आहेत. तर 2017 मध्ये 40 पैकी 40 आमदार करोडपती होते. उमेदवारांनी घोषित केलेल्या संपत्तीनुसार Revolutionary Goans Party चा एक उमेदवार वगळता बाकी सर्वच पक्षांचे जिंकलेले उमेदवार हे करोडपती आहेत.
भाजप - 20 उमेदवार करोडपती
काँग्रेस - 11 उमेदवार करोडपती
अपक्ष - 3 उमेदवार करोडपती
महाराष्ट्रवादी गोमंतक - 2 उमेदवार करोडपती
आप - 2 उमेदवार करोडपती
गोवा फॉरवर्ड - 1 उमेदवार करोडपती
दरम्यान, 75 टक्के उमेदवारांची संपत्ती 5 करोडच्या वर आहे, तर 20 टक्के उमेदारांची संपत्ती 2 करोड ते 5 करोडच्या दरम्यान आहे. राहिलेल्या इतर 5 टक्के उमेदवारांची संपत्ती 1 करोड ते 2 करोडच्या दरम्यानची आहे. त्यामुळे जवळपास सर्व जिंकलेले उमेदवार हे करोडपती आहेत.
गोवा विधानसभेतील 40 पैकी तब्बल 30 नवनियुक्त उमेदवारांकडे 5 करोडपेक्षा जास्तीची संपत्ती आहे. उर्वरीत 8 उमेदवारांकडे 2 करोड ते 5 करोड दरम्यानची संपत्ती आहे. एका उमेदवाराकडे एक करोड ते दोन करोड दरम्या संपत्ती आहे. तर राहिलेल्या एका उमेदवाराकडे 50 लाखांपेक्षा कमी संपत्ती आहे. ही सर्व आकडेवारी या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातली आहे.
सर्वाधिक संपत्तीचा आकडा -
गोवा विधानसभा निवडणुकीतील जिंकलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधित 20.16 करोड एवढी संपत्ती आहे. तर हाच आकडा 2017 मध्ये मात्र 10.90 करोड एवढा होता. म्हणजेच 2017 पेक्षा 2022 मध्ये उमेदवारांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली आहे.
गोव्यातील पक्ष आणि उमेदवारांची एकूण संपत्ती -
भाजप - 20 उमेदवारांची एकूण संपत्ती 15.32 करोड
काँग्रेस - 11 उमेदवारांची एकूण संपत्ती 31.26 करोड
महाराष्ट्रवादी गोमंतक - 2 उमेदवारांची एकूण संपत्ती 14.30 करोड
आप - 2 उमेदवारांची एकूण संपत्ती 8.67 करोड
सर्वाधिक जिंकलेले श्रीमंत उमेदवार -
काँग्रेस उमेदवार डेलिलाह मायकल लोबो आणि मायकेल व्हिन्सेंट लोबो हे सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. डेलिलाह या सिलोम मतदारसंघातून विजयी झाल्या, त्या पदवीधर असुन 44 वर्षांच्या आहेत. त्यांची एकूण घोषित संपत्ती 92.9 कोटी रुपये आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो विजयी झाले आहेत. लोबो यांनी, 2017 आणि 2012 मध्ये झालेल्या दोन विधानसभा निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकल्या होत्या. त्यांची एकूण घोषित संपत्ती 92.9 कोटी रुपये आहे. तिसरा सर्वात श्रीमंत अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बिचोलीममधून निवडणूक जिंकली असून, त्यांची एकूण घोषित संपत्ती ५९ कोटी पेक्षा जास्त आहे.
पणजी विधानसभा मतदारसंघातून मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांचा पराभव करत भाजपच्या तिकीटावर पुन्हा जिंकून आलेले बाबूश उर्फ अन्टॅनसीओ मोंसरात ४८ कोटी पेक्षा जास्त संपतीचे मालक आहेत. तळेगाव मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या जेनिफर मॉन्सेरेट यांच्याकडे कोटी पेक्षा जास्त आहे. फातोर्डा मतदार संघातून निवडूण आलेले गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई यांच्याकडे ३७ कोटीपेक्षा जास्तीची संप्पती आहे. सेंट क्रुझ मतदार संघातून काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडूण आलेले उमेदवार रोडॉल्फो लुई फर्नांडिस यांच्याकडे ३४ कोटी पेक्षा जास्त तर कमकोलिम मतदार संघातील काॅंग्रेसचे उमेदवार आलेमाओ युरी यांच्याकडे ३० कोटी पेक्षा जास्त कर्चोरेम मतदार संघातुन विजयी भाजप उमेदवार निलेश काब्राल यांची संप्पत्ती २८ कोटी पेक्षा जास्त आहे. तर पोरीम मतदारसंघातील भाजप उमेदवार देविया विश्वजित राणे यांची संपत्ती २३ कोटी पेक्षा आधिक आहे.