ETV Bharat / bharat

Forbes Billionaires List : जगातील टॉप-20 यादीत गौतम अदानी, फोर्ब्सच्या अहवालानुसार १८व्या क्रमांकावर - फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा आले गौतम अदानींचे नाव. अदानी पोहचले थेट 22व्या क्रमांकावरून 18व्या क्रमांकावर.

Forbes Billionaires List
जगातील टॉप-20 यादीत गौतम अदानी
author img

By

Published : Feb 6, 2023, 6:00 PM IST

नवी दिल्ली : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये त्सुनामी आली. सुमारे $118 अब्जच्या तोट्यासह त्यांची एकूण संपत्ती निम्मी झाली आहे. यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप-20 यादीतून बाहेर पडले. मात्र फोर्ब्सच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत २२व्या क्रमांकावरून त्यांचे नाव १८व्या क्रमांकावर पोहोचले. गौतम अदानी आता अब्जाधीशांच्या यादीत जिम वॉल्टनच्या वर पोहोचले आहे. त्यांची एकूण संपत्ती ६१.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था : हिंडेनबर्ग शॉर्ट सेलरचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील फेरफार, फसवणूक किंवा मनी लाँड्रिंगसारखे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, अदानी समूह सातत्याने त्या आरोपांचे खंडन करत असून; हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र एवढे करूनही अदानी एंटरप्रायझेस गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकू शकली नाही. शेअरच्या किमती घसरल्याने अदानी समूहाचे बाजार भांडवल जवळपास निम्म्यावर आले आहे. 10 दिवसात झालेली ही घसरण आलेखाद्वारे बघुया.

तारीख निव्वळ मूल्य
24 जानेवारी$ 127 अब्ज
25 जानेवारी$ 120 अब्ज
26 जानेवारी $ 120 अब्ज
27 जानेवारी98.1 अरब डॉलर (FPO जारी)
30 जानेवारी$ 88.2 अब्ज
31 जानेवारी$ 89.1 अब्ज
1 फेब्रुवारी$ 74.7 अब्ज (श्रीमंतांच्या यादीत 15 व्या क्रमांकावर)
2 फेब्रुवारी$ 64.2 अब्ज (श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर)
३ फेब्रुवारी५८ अब्ज डॉलर (श्रीमंतांच्या यादीत २२ व्या क्रमांकावर)

अदानी समूहाची स्थिती : बीएसईवर अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मार यांचे समभाग पाच टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. त्याच वेळी अदानी ट्रान्समिशन 10 टक्क्यांनी खाली आले. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन 0.53 टक्क्यांनी वाढून 501.50 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय अदानी समूहाच्या इतर कंपन्या… अंबुजा सिमेंट्स ३.२८ टक्क्यांनी, एसीसी ०.८२ टक्क्यांनी आणि एनडीटीव्ही ४.९८ टक्क्यांनी घसरले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पही धोक्यात? : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी यांना दिलेले कंत्राट आता रद्द करावे, अदानी यांची आर्थिक दिवाळखोरी समोर आल्याने ते सक्षम नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावनांशी सरकारने खेळू नये, नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने केल्याची माहिती अध्यक्ष राजू कोरडे यांनी दिली आहे.

हेही वाचा : Adani Group Share : अदानी समूहाच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच, मार्केट कॅप निम्म्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.