अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी ग्रुपला मोठा दिलासा, 'हा' दिला निर्णय - Hindenburg case today
Adani Hindenburg Case : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (नोव्हेंबर 2023) मध्ये आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज (३ जानेवारी) रोजी सकाळी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. प्रलंबित तपास तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयानं सेबीला निर्देश दिले आहेत.


Published : Jan 3, 2024, 10:54 AM IST
|Updated : Jan 3, 2024, 2:15 PM IST
नवी दिल्ली : Adani Hindenburg Case : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावर गेल्यावर्षी सुनावणी झाली होती. परंतु, त्यावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता. त्यावेळी या सुनावणीदरम्यान सेबीच्या तपासाच्या निष्पक्षतेवर आणि तज्ज्ञ समितीच्या सदस्यांवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले होते. आता या प्रकरणाचा निकाल आज लागला आहे.
सेबीकडून या प्रकरणाची चौकशी : सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, असं कोणतंही तथ्य नाही, ज्यामुळे सेबीवर शंका घेतली जाऊ शकते. ठोस कारणांशिवाय आम्ही सेबीवर अविश्वास दाखवू शकत नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांच्या वकिलांनापर्यंत (२७ सप्टेंबर २०२३) न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं होतं.
-
The Hon'ble Supreme Court's judgement shows that:
— Gautam Adani (@gautam_adani) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Truth has prevailed.
Satyameva Jayate.
I am grateful to those who stood by us.
Our humble contribution to India's growth story will continue.
Jai Hind.
">The Hon'ble Supreme Court's judgement shows that:
— Gautam Adani (@gautam_adani) January 3, 2024
Truth has prevailed.
Satyameva Jayate.
I am grateful to those who stood by us.
Our humble contribution to India's growth story will continue.
Jai Hind.The Hon'ble Supreme Court's judgement shows that:
— Gautam Adani (@gautam_adani) January 3, 2024
Truth has prevailed.
Satyameva Jayate.
I am grateful to those who stood by us.
Our humble contribution to India's growth story will continue.
Jai Hind.
सत्यता पडताळण्याचे कोणतही साधन नाही : हिंडनबर्ग संशोधन अहवालात झालेल्या खुलाशांच्या संदर्भातील याचिकाकर्त्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालाला सत्य विधान मानता येणार नाही, अशी टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुढं सांगितलं की, हिंडनबर्ग अहवालाची सत्यता पडताळण्याचं कोणतही साधन नाही. त्यामुळं त्यांनी सेबीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. सेबीनं आपला तपास अहवाल सादर केलाय.
हिंडेनबर्गचा अहवाल कधी आला ? : (२४ जानेवारी २०२३) रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांबाबत अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तर, अदानी समूहानं हा अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं होतं. हा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यांच्या मालमत्तेचही मोठं नुकसान झालं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचेल. त्यावर आज निकाल आला आहे.
रेकॉर्डब्रेक निकाल नोंदवले : अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं की, २०२३ हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या समूहासाठी खूप चढ-उतारांचं राहीलं. हिंडेनबर्गच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे काही काळासाठी काही समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु आपल्या समुहाने पुन्हा एकदा या आव्हानांवर मात केली आहे. आगामी काळात आपले पूर्वनिश्चित ध्येय साध्य होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अदानी म्हणाले की, हिंडेनबर्ग आरोपांनंतर, आम्ही केवळ बाउन्स बॅक केले नाही. तर रेकॉर्डब्रेक निकालदेखील नोंदवले आहेत. आमचे सर्वात आव्हानात्मक वर्ष अभूतपूर्व ताकदीने संपवलं आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
१ निर्मला सीतारामन यांना बडतर्फ करा; आयआरएस अधिकाऱ्यानं राष्ट्रपतींना पत्र लिहण्यामागं काय आहे कारण?
२ गृह सचिवांची ट्रक चालकांच्या प्रतिनिधींसोबतची बैठक यशस्वी; संप मागं घेण्याचं आवाहन
३जपानच्या दोन विमानांची जोरदार टक्कर; जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग, पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू