ETV Bharat / bharat

Adani Group Share : अदानी समूहाच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच, मार्केट कॅप निम्म्यावर - अदानी समूहाचे मार्केट कॅप

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​समभाग 9.50 टक्क्यांपर्यंत घसरले. त्यामुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप जवळपास निम्म्यावर आले आहे.

Adani Group Share
अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण
author img

By

Published : Feb 6, 2023, 4:22 PM IST

मुंबई : हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी साम्राज्यात खळबळ उडाली आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सर्व 10 समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड 9.50 टक्क्यांपर्यंत घसरले. 1,597.95 रुपयांच्या कमी किमतीत शेअर सुरु झाल्यानंतर, अदानी एंटरप्रायझेस बीएसईवर आणखी 1,433.60 रुपयांपर्यंत घसरले, जे मागील क्लोजिंग दराच्या तुलनेत 9.50 टक्क्यांनी घसरले. नंतर शेअर 6.54 टक्क्यांनी घसरून 1480.65 रुपयांवर स्थिर झाले होते.

अदानी समभागांची स्थिती: अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मार हे बीएसईवर पाच टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी अदानी ट्रान्समिशन 10 टक्क्यांनी खाली आले. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन 0.53 टक्क्यांनी वाढून 501.50 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय अदानी समूहाशी संबंधित इतर कंपन्या जसे की, अंबुजा सिमेंट 3.28 टक्के, एसीसी 0.82 टक्के आणि एनडीटीव्ही 4.98 चे शेअर टक्क्यांनी घसरले. हिंडनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाला सुमारे 118 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, या अहवालामुळे कंपनीचे बाजारमूल्य निम्म्याहून अधिक नष्ट झाले आहे.

अदानीबद्दल संसदेत गोंधळ : वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांची जोखीम, चिंता वाढत असताना सततच्या होणाऱ्या विक्रीचे परिणाम दूरवर पसरत आहेत. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत झाले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर मौन बाळगून असल्याने, भारताचा मुख्य विरोधी पक्ष त्यांच्यावर दबाव वाढवत आहे. अश्यातच अदानी समुहात गुंतवणूक केलेल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी, सोमवारी देशव्यापी मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

कंपनीचे बाजारमूल्य अर्ध्याहून कमी : अदानी समुहाला 24 जानेवारी रोजी प्रसिध्द आलेल्या हिंडनबर्ग अहवालानंतर एकामागून एक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने BOND देखील रद्द करण्यात आला. अदानी समूहाला 20 हजार कोटींचा पहिला एफपीओ रद्द करावा लागला. त्यानंतर 10 अब्ज रुपयांचे ($122 दशलक्ष) बॉन्ड (रोखे) देखील रद्द करण्यात आले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कंपनीने बाँड मागे घेण्याचा निर्णय घेतला. हिंडेनबर्ग अहवालानंतर कंपनीचे बाजारमूल्य अर्ध्याहून कमी राहिले आहे.

ब्लूमबर्गने आपल्या डिसेंबरच्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या प्रमुख फर्मने जानेवारीमध्ये पब्लिक नोट जारी करण्याची योजना आखली, ज्यासाठी कंपनी एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, एके कॅपिटल, जेएम फायनान्शियल आणि ट्रस्ट कॅपिटल यांच्याशी भागीदारी करत आहे, ती रद्द करण्यात आले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालाचे आरोप : अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर फसवे व्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतरच अदानी समूहाने 20 हजार कोटी रुपयांचा अदानी एंटरप्रायझेस एफपीओ काढून घेतला होता. आता ताज्या अहवालानुसार बाँडही रद्द करण्यात आला आहे. तथापि, अदानी समूहाने हे आरोप खोटे असल्याचे नाकारले आहे आणि ते सर्व कायदे आणि स्पष्टीकरणाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.