ETV Bharat / bharat

Shah Rukh Khan : माझ्यावर निगेटिव्हिटीचा परिणाम होत नाही - शाहरुख खान

author img

By

Published : Dec 15, 2022, 8:14 PM IST

28 वा आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सव (Kolkata International Film Festival) सध्या सुरू झाला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) उपस्थित होता. सध्या निगेटिव्हिटीचा सोशल मीडियावर वावर वाढला आहे. परंतु माझ्यासारख्या व्यक्तीवर या निगेटिव्हिटीचा प्रभाव पडत नाही, अशी प्रतिक्रिया (Shah Rukh Khan in Kolkata Film Festival) शाहरुखने यावेळी दिली.

Etv Bharat
Etv Bharat

कोलकाता : गुरुवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन (Kolkata International Film Festival) केले. (Kolkata International Film Festival inauguration). या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता महेश बाबू, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनीही हजेरी लावली होती. अधिकृत वेबसाइटनुसार, पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे आयोजित कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 28 वी आवृत्ती कोलकाता येथे 15 ते 22 डिसेंबर 2022 दरम्यान होणार आहे.

माझ्यावर नकारात्मकतेचा परिणाम होत नाही : यावेळी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान म्हणाला, "नकारात्मकतेचा सोशल मीडियावर वावर वाढला आहे. परंतु त्याच्यासारख्या व्यक्तीवर या नकारात्मकतेचा प्रभाव पडत नाही. सोशल मीडिया बर्‍याचदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालतो जो मानवी स्वभावाला त्याच्या मूलभूत स्वार्थापुरता मर्यादित करतो. जग काहीही म्हणो, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील". शाहरुखने सोहळ्याला काळ्या रंगाचा थ्री-पीस सूट घातला होता, तर राणी मुखर्जी देखील सोहळ्याला काळ्या रंगाच्या सुंदर साडीत आली होती.

भारतीय पाश्चिमात्य कल्पना नाकारण्याचा प्रयत्न करतात : आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी रवींद्रनाथ टागोर यांना उद्धृत केले. भट्ट म्हणाले, "सध्याच्या राजकीय अशांततेच्या काळात भारतातील मुले पाश्चिमात्य कल्पना नाकारण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांना पश्चिमेकडून मिळालेला धडा आहे. हे आमचे ध्येय नाही. सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी भारत आहे. टागोरांचे हे शब्द सर्व भारतीयांच्या हृदयात गुंजले गेले पाहिजे. कोणतीही गोष्ट, कोणताही वंश, कोणतीही संस्कृती नाकारणे हा भारताचा आत्मा नाही. सर्व गोष्टी सहानुभूती आणि प्रेमाने समजून घेणे हे आमचे सर्वोच्च उद्दिष्ट असले पाहिजे. हा भारताचा आत्मा आहे".

शाहरुखचे आगामी चित्रपट : अभिनेता शाहरुख खान येणाऱ्या काळात दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या सोबत दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय शाहरुख खान दक्षिणेतील दिग्दर्शक एटलीच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'जवान' आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा पुढील चित्रपट 'डंकी' मध्ये तापसी पन्नूसोबत दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.