ETV Bharat / bharat

Alia Ranbir Wedding : आली लग्नघडी! आलिया-रणबीर होणार आज विवाहबद्ध - आलिया-रणबीर यांचे लग्न कुठे आहे

गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार ज्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती ते लग्न अखेर आज होत आहे. (Alia Ranbir Wedding Today) अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा विवाह आज सांयकाळी मुंबईतील आरके हाऊसमध्ये होत आहे. या विवाहासाठी सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

आलिया-रणबीर
आलिया-रणबीर
author img

By

Published : Apr 14, 2022, 9:13 AM IST

मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज (दि. 14 एप्रिल)रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. आलिया आणि रणबीरचे चाहतेच नव्हे तर दोन्ही कुटुंबही या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. (Actor Ranbir and actress Alia) लग्नाच्या तारखेबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, 13 एप्रिलच्या रात्री रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी लग्न आज होणार असल्याचा खुलासा केला आहे.

संध्याकाळी शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा - आलिया आणि रणबीरचा काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पूजा आणि मेहंदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंबासह निवडक बॉलिवूड लोक उपस्थित होते. त्यांनतर आज सकाळी हळद, चुडा सोहळा होणार असून संध्याकाळी शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा सुरू होईल.

रणबीर कपूरच्या आईची माहिती - आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये आज आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत.

लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील - आज सकाळी 9 वाजल्यापासून हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कुटुंबातील सदस्य वधू आणि वर दोघांना हळद लावतील. यानंतर आलियाला चुडा घातला जाईल. हे विधी पूर्ण झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरू होईल. रणबीर कपूरची वरात मुंबईतील चेंबूर येथील कृष्णा राज बंगला (आरके हाऊस) ते टोनी पाली हिल परिसरात असलेल्या आलियाच्या 'वास्तू'पर्यंत जाईल. संपूर्ण कपूर कुटुंब वास्तूमध्ये येणार. हे दोन्ही बंगले एक किलोमीटरहून कमी अंतरावर आहेत. येथे लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील. कपूर कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा आहे, ज्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

पोलिसांचा ताफा तैनात - रणबीर-आलियाच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित असणार आहेत. लग्नानंतर त्यांनी एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचणार आहेत. 17 एप्रिल रोजी हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यामध्ये इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रणे पाठवली जाणार आहेत. बॉलिवूडच्या या बहुचर्चित लग्नासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. सर्व व्यवस्थित पार पडावे यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी - आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. या लिस्टनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, जोया अख्तर, संजय लीला भंसाली, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे.

मित्र परीवार - आलिया आणि रणबीर यांचे जवळचे मित्र-मैत्रीणी देखील या रॉयल विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर आणि शाहरुख खान हे आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा - Ambedkar jayanti 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्याशी 'हे' अतुट नाते, वाचा..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.