ETV Bharat / bharat

Prabhas Ravan Dahan: पडद्यावरील राम करणार रावण दहन, लोकांमध्ये प्रभासला पाहण्यासाठी वाढली क्रेझ.. - लव कुश रामलीला रावण दहन

सुपरस्टार प्रभास (prabhas) दसऱ्याच्या दिवशी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर रावण दहन करतील (Prabhas Ravan Dahan) अशी बातमी समोर आल्यानंतर लोकांमध्ये आत्तापासूनच याबाबत क्रेझ वाढली आहे. प्रभासच्या क्रेझ मुळे आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक पास वितरित करण्यात आले आहेत.

lav kush ramlila
lav kush ramlila
author img

By

Published : Oct 5, 2022, 12:31 PM IST

Updated : Oct 5, 2022, 12:37 PM IST

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर होणारी ऐतिहासिक लव कुश रामलीला (lav kush ramlila) पूर्वीपासूनच लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आता सुपरस्टार प्रभास (prabhas) दसऱ्याच्या दिवशी येथे रावण दहन करतील (Prabhas Ravan Dahan) अशी बातमी समोर आल्यानंतर लोकांमध्ये आत्तापासूनच याबाबत क्रेझ वाढली आहे. प्रभासला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आयोजकांना दर तासाला हजारो फोन येत आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) हे देखील पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोबतच 15 विविध देशांचे राजदूतही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

एक लाखाहून अधिक जनसमुदाय जमू शकतो: कोरोनामुळे 2 वर्षांच्या कालावधीनंतर राजधानी दिल्लीत 600 हून अधिक ठिकाणी रामलीलांचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत लवकुश रामलीलेचे पाच लाखांहून अधिक पास वितरित करण्यात आले आहेत. लव कुश रामलीला समितीने सोमवारी जारी केलेल्या माहितीनुसार, रामलीला मंचाच्या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या 40,000 च्या पुढे गेली आहे. दसऱ्याच्या दिवशी हा आकडा १ लाखाचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.

प्रभासमुळे झाले 5 लाखांहून अधिक पासचे वाटप: लवकुश रामलीलाचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितले की, दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण लक्ष रामलीला स्टेज करण्यावर असेल, पण सुपरस्टार प्रभासच्या क्रेझ मुळे आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक पास वितरित करण्यात आले आहेत. तसेच अतिरिक्त दोन लाख पासची छपाई सुद्धा केली जात आहे. रावण दहनाच्या वेळेस काही आश्चर्यकारक स्टंट्सही पाहायला मिळणार आहेत.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था: दहनाच्या दिवशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लवकुश रामलीला समितीने लीला मंचाच्या ठिकाणी 125 सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने चोवीस तास मॉनिटरिंग केले जाणार आहे. रामलीलेच्या ठिकाणी 800 हून अधिक स्वयंसेवक सुरक्षेत तैनात असतील. तसेच 120 ब्लॅक कमांडो सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. लीला कार्यक्रमादरम्यान दिल्ली पोलीस सुरक्षा दलाचे अतिरिक्त कर्मचारी मंचावर उपस्थित राहणार आहेत.

नऊ पुतळ्यांची प्रतिष्ठापना: समितीच्या म्हणण्यानुसार, यावेळी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या तीन नव्हे तर नऊ पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या पुतळ्यांची उंची 100 फुटांपर्यंत असेल. मुख्यमंत्री केजरीवाल, प्रभास आणि राष्ट्रपती मुर्मू या तिघांनाही रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे एकत्र दहन करता यावे यासाठी 9 पुतळे लावले गेले आहेत.

Last Updated : Oct 5, 2022, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.