ETV Bharat / bharat

Zika Virus : झिका व्हायरसचा भविष्यात धोका, टाळण्यासाठी ICMR ने दिल्या सुचना - zika virus disease

केरळमध्ये झिका विषाणूचा प्रसार ( zika virus disease ) झाल्याचा पहिला अहवाल इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ( Indian Council for Medical Research ) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ( National Institute of Virology ) (ICMR-NIV) पुणे यांनी प्रसिद्ध केला आहे. या अहवालात त्यांनी म्हटले आहे की, भविष्यातील झिका विषाणूचा ( zika virus symptoms ) उद्रेक कमी करण्यासाठी देशभरात सक्रिय मानवी आणि कीटकशास्त्रीय देखरेखीची गरज आहे.

Zika Virus
झिका व्हायर
author img

By

Published : Feb 11, 2022, 2:19 PM IST

नवी दिल्ली - केरळमध्ये झिका विषाणूचा प्रसार ( zika virus disease ) झाल्याचा पहिला अहवाल इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ( Indian Council for Medical Research ) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ( National Institute of Virology ) (ICMR-NIV) पुणे यांनी प्रसिद्ध केला आहे. या अहवालात त्यांनी म्हटले आहे की, भविष्यातील झिका विषाणूचा ( zika virus symptoms ) उद्रेक कमी करण्यासाठी देशभरात सक्रिय मानवी आणि कीटकशास्त्रीय देखरेखीची गरज आहे.

गेल्या वर्षी केरळमधील झिका विषाणूच्या प्रकरणांचा प्रवासाचा इतिहास आढळला नाही आणि त्याचा समाजातील प्रसाराशी संबंध होता. "गेल्या एका महिन्यामध्ये या प्रकरणांचा कोणताही प्रवास इतिहास नव्हता. वरवर पाहता, या प्रकरणांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणाचेही वैद्यकीय संशोधनात समानता आढळली नव्हती. या कालावधीत तुरळकपणे नोंदवलेली प्रकरणे कदाचित समाजातही ZIKV चे प्रसार झाला असावा असे अहवालात म्हटले आहे."

'देशात झिकाच्या देखरेखीची आवश्यकता'

देशाच्या इतर भागांमध्येही झिकाच्या सक्रिय मानवी आणि कीटकशास्त्रीय देखरेखीची गरज असल्याचे या अहवालात सांगितले आहे. 'अहवालाच्या निष्कर्षानुसार या रोगाची चाचणी ही विषाणूच्या चाव्यातून या रोगाचा प्रसार होत असल्याचे सांगितले आहे. निष्कर्षानुसार, तपासणीचे निष्कर्ष भविष्यातील उद्रेक कमी करण्यासाठी देशभरात झिकाच्या सक्रिय मानवी आणि कीटकशास्त्रीय देखरेखीची आवश्यकता आहे' असे अहवालात म्हटले आहे.

झिका प्रकरणे वेळेवर ओळखण्यात मदत -

झिका विषाणूची ही प्रकरणे केरळमध्ये COVID-19 च्या दुसऱ्या वाढीदरम्यान नोंदवली गेली आणि त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडला. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी केरळ राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची तयारी आणि सक्रिय पाळत ठेवल्याने झिका प्रकरणे वेळेवर ओळखण्यात मदत झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

झिका व्हायरसची प्रकरणे ही इतर राज्यासह विदेशातही आढळली -

गेल्या वर्षी भारतात केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आढळले होते. झिका विषाणू (ZIKV) रोग (ZVD) हा ब्राझीलमधील 2016 नंतरच्या उद्रेकाच्या चिंताजनक सार्वजनिक आरोग्य रोगांपैकी एक मानला जातो. मायक्रोसेफली, जन्मजात झिका सिंड्रोम आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या घटनांशी मच्छर-जनित फ्लेविव्हायरस संबंधित असल्याचे नोंदवले गेले आहे. 1947 मध्ये युगांडातील झिका जंगलातून त्याचा शोध लागल्यापासून, आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया आणि पॅसिफिक बेटांमधून ZVD चे अनेक उद्रेक नोंदवले गेले आहेत. याशिवाय, झिकाची अनेक प्रवासाशी संबंधित प्रकरणे विविध देशांतून नोंदवली गेली आहेत. भारतात ZVD चे पहिले प्रकरण गुजरातमधून नोंदवले गेले आहे.

हेही वाचा - Medical Education Departments : वैद्यकीय शिक्षण विभागांमधील मतभेद दूर करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.