ETV Bharat / bharat

Action on Naxalite in Sukma: सुकमा येथे नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, 5 ते 6 नक्षलवादी जखमी - Naxalites

सुकमा येथून पोलीस आणि नक्षलवादी चकमकीची बातमीसमोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील सकलेर भागातील असल्याची माहिती आहे. जिथे बुधवारी सकाळी ६ वाजता कोब्रा/एसटीएफ आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली.

Action on Naxalite in Sukma
नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक
author img

By

Published : Mar 9, 2023, 1:07 PM IST

सुकमा : बस्तर विभागातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी सातत्याने आपली उपस्थिती नोंदवत आहेत. जिल्ह्याच्या अंतर्गत भागात नक्षलवादी कारवाया तीव्र झाल्या आहेत. बुधवारी सकाळी शोध मोहीमेसाठी गेलेले जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांचे बीजीएल आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केली आहेत. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलाच्या पथकाने प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांना परत लावले आहे. या कारवाईत ५ ते ६ माओवादी जखमी झाल्याचीही माहिती आहे.

ही आहे संपूर्ण घटना : गुरुवारी सकाळी 6.00 वाजता, कोब्रा 208 आणि एसटीएफचे संयुक्त पथक सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस स्टेशन क्षेत्राच्या डब्बामरका पोलीस कॅम्पमधून नक्षलविरोधी अभियानासाठी सकलेर भागात रवाना करण्यात आले होते. त्यामुळे जंगलात उपस्थित 7 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे जवान आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर जवानांनीही मोर्चा सांभाळताना नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात पाच ते सहा नक्षलवादी जखमी झाले. जवानांची आक्रमकता पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादा्यांनी ङटनास्थळावरून पळ काढला.

परिसराचा शोध सुरू : चकमक थांबताच जवानांनी परिसरात शोधकार्य सुरू केले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांनी गोळीबारात वापरलेली बीजीएल आणि इतर स्फोटकेही जप्त केली आहेत. यासोबतच जवानांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सुकमा जिल्ह्यातील गदिरस भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. चकमकीनंतर जवानांनी परिसराची झडती घेतली. त्यानंतर जवानांना झडती दरम्यान नक्षलवादी दाम्पत्य मोठ्या दगडांच्या मागे लपलेले दिसले. नक्षलवादी जोडप्याला घेराव घालून अटक करण्यात आली आहे. ज्यांच्यावर छत्तीसगड सरकारने लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा : Naxalites Security Forces Encounter: लखीसराय येथे पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक: कट्टर नक्षलवादी श्री कोडा अटकेत, शस्त्रे जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.