इंदूर (मध्यप्रदेश) - देशभरात रेमडेसिवीरसाठी राजकारण पेटताना दिसत आहे. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे या इंजेक्शनची साठेबाजी करणे, अवाच्या सवा दराने विकत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, मध्यप्रदेशच्या इंदूरमधअये रेमडेसिवीरच्या व्हाइलमध्ये ग्लुकोज भरून विकेल जात होते. या प्रकरणी लसुडिया पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
ग्लूकोज भरुन विकत होते 20 हजार रुपयांला एक रेमडेसिवीर
एका व्यक्तीने उपचारासाठी संबंधितांकडून रेमडेसिवीर वीस हजार रुपयांना खरेदी केले. त्यानंतर ती व्यक्ती रुग्णालयात इंजेक्शन घेऊन पोहोचली. मात्र, डॉक्टरांनी यामध्ये ग्लुकोज आहे, असे सांगितले. संतापलेल्या व्यक्तीने लसुडिया पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत लसुडिया पोलिसांनी उज्ज्वल पटेल व अमित अवस्थी या दोघांना ताब्यात घेतले तर उर्वरीत तीन आरोपींच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -रेमडेसिवीर बाहेर विकून रुग्णाला दिले सलाईन वॉटर; यूपीच्या रुग्णालयातील प्रकार