नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या (आप) पहिल्या ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नर First transgender candidate bobby kinnar यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. एमसीडीमध्ये जिंकणारी ती पहिली ट्रान्सजेंडर आहे. बॉबी किन्नर (३८) या 'हिंदू युवा समाज एकता अवाम दहशतवाद विरोधी समिती'च्या दिल्ली युनिटच्या अध्यक्ष आहेत. अण्णांच्या आंदोलनातही बॉबी खूप सक्रिय होत्या. Popular transgender candidate Bobby Kinnar won
दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करणारी बॉबी ही पहिली ट्रान्सजेंडर आहे. राजकारणातून समाजसेवा करण्याची संधी आम आदमी पक्षाने दिली आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर बॉबी किन्नर यांना प्रभाग 43 सुलतानपुरी-अ मधून तिकीट देण्यात आले. एमसीडी निवडणुकीत ट्रान्सजेंडरला तिकीट देणारा आम आदमी पक्ष हा पहिला पक्ष ठरला आहे. बॉबी किन्नर यांनी 2017 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली होती.
-
Bobi, the AAP candidate from Sultanpuri-A ward, wins. For the first time, MCD to have a member of the transgender community. #DelhiMCDElectionResults2022 pic.twitter.com/FfbE9g4Im1
— ANI (@ANI) December 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bobi, the AAP candidate from Sultanpuri-A ward, wins. For the first time, MCD to have a member of the transgender community. #DelhiMCDElectionResults2022 pic.twitter.com/FfbE9g4Im1
— ANI (@ANI) December 7, 2022Bobi, the AAP candidate from Sultanpuri-A ward, wins. For the first time, MCD to have a member of the transgender community. #DelhiMCDElectionResults2022 pic.twitter.com/FfbE9g4Im1
— ANI (@ANI) December 7, 2022
आमचा मुद्दा दिल्लीच्या स्वच्छतेचा आहे, असे बॉबी किन्नर म्हणाल्या. मी जिंकून आले तर आधी माझ्या प्रभागातील स्वच्छतेची कामे करून देईन. ती एका सामान्य कुटुंबातील असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पण मी निवडणूक लढवावी, असे जनतेने सांगितले. लोक माझी निवडणूक एकत्र लढत आहेत. माझ्याप्रमाणे माझ्या समाजातील लोकांनीही पुढे जाऊन राजकारणात भाग घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.