लुधियाना (पंजाब) - लुधियाना येथील रहिवासी तथा पंजाब पोलीसमध्ये एएसआई सुनीता राणी ( women police officer sunita rani ) या माणूसकीचे उदाहरण ठरल्या आहेत. सुनीता राणी ( sunita rani cremate dead body Ludhiana ) या बेवारस मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या या कार्याची चर्चा होत आहे.
हेही वाचा - Girl Jumped From Height of 100 feet : चित्रकोट धबधब्यात 100 फुटावरून तरुणीची उडी, बचाव पथकाकडून शोध सुरू
सुनीता यांनी 2019 मध्ये ही सेवा सुरू केली आणि गेल्या 4 वर्षांत त्यांनी 2 हजार 200 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. सर्व विधी त्या स्वतः करतात. सुनीता ही सेवा करत असल्याचे लुधियानामधील काही मोजक्याच पोलीस अधिकाऱ्यांना माहीत आहे. लुधियानाच्या कोणत्याही रुग्णालयात जेव्हा जेव्हा दावा नसलेला मृतदेह येतो, तेव्हा अंत्यसंस्कारासाठी सर्वप्रथम सुनीता राणी यांची आठवण होते.
या कामासाठी स्वत: खर्च करतात - सुनीता राणी म्हणाल्या की त्या आपल्या पगारातून बेवारस मृतदेहावर सर्व खर्च करतात. जेव्हा हे काम सुरू केले तेव्हा काही लोक जुळळे. पण, नंतर सर्व मागे हटले. पण, आता आपण एकटेच ही सेवा करत असल्याचे त्या म्हणाल्या. 2025 मध्ये त्या नोकरीतून निवृत्त होणार आहेत तरीही ही सेवा अविरत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेवारस मृतदेह येतात कोठून? - लुधियाना हे मोठे शहर आहे. येथे भरपूर गुन्हे होतात. मृतदेह जीआरपीकडून, आरपीएफकडून मिळतो. पोलीस मृतदेह रुग्णालयात घेऊन जातात. या मृतदेहांवर कोणी दावा न केल्यास शवविच्छेदन झाल्यावर सुनीता त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.
ही सेवा का? - ही सेवा तुम्ही का सुरू केली? असे विचारले असता, आपल्याला मनशांती आणि समाधान लाभते. या बेवारस मृतदेहाची आई, बहीण आणि मुलगी म्हणून मी अंत्यसंस्कार करते. अंत्यसंस्कार करणे खूप महत्वाचे आहे, असे सुनीता राणी म्हणाल्या.
हेही वाचा - Tunnel Collapse Jammu : जम्मू-काश्मीर महामार्गावर बोगद्याचा भाग कोसळला: 4 जखमी, अनेकजण अडकले