बारपेटा - लग्नापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका नवविवाहित महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील कलगछिया अंतर्गत असलेल्या दिगजनी गावात ही महिला राहात होती. त्याच गावातील एका युवकाने या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. व्हिडिओमध्ये ती महिला तिच्या पूर्वीच्या प्रियकराबरोबर वेळ घालवत असताना दिसत आहे. तसेच मित्रांसोबत ती धूम्रपान करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा - राजकारणात येण्यापूर्वीच रजनीकांत यांचा "राजकारण संन्यास"
- लग्नाला झाले होते फक्त दोनच महिने -
मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील एका महिलेचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर तिच्या गावातील एका युवकाने महिलेच्या पूर्वीच्या प्रियकरासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ त्या नवविवाहित महिलेच्या पतीला मिळाला. तो व्हिडिओ पाहून पतीने पत्नीला लगेच घराबाहेर काढले. त्यानंतर ती महिला प्रियकराच्या घरी गेली असता, तिथेही त्या महिलेला शिवीगाळ करत घराबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर नवविवाहित महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली असून, तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाता पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - सहकार खाते शाह यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचे कारण नाही - संजय राऊत