ETV Bharat / bharat

Ramoji Film City रामोजी फिल्म सिटीने केला IRCTC सोबत करार, पर्यटनाला मिळणार चालना

करारानुसार, देशभरातील पर्यटन संस्थांना IRCTC मार्फत रामोजी फिल्म सिटीच्या Ramoji Film City पॅकेजची माहिती दिली जाईल. Agreement Between RFC and IRCTC

RFC Inks Pact with IRCTC
रामोजी फिल्म सिटीने केला IRCTC सोबत करार
author img

By

Published : Aug 18, 2022, 8:32 PM IST

हैदराबाद IRCTC ने हैद्राबाद येथील प्रसिद्ध अशा रामोजी फिल्म सिटीशी करार केला आहे. रामोजी फिल्म सिटी Ramoji Film City ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे प्रमाणित जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी आहे. करारानुसार, देशभरातील पर्यटन संस्थांना IRCTC मार्फत रामोजी फिल्म सिटीच्या पॅकेजची माहिती दिली जाईल. Agreement Between RFC and IRCTC

IRCTC दक्षिण मध्य विभागाचे जीएम नरसिंगा राव यांनी रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी यांच्याशी करार केला. राव यांनी आशा व्यक्त केली की हा करार पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास खूप मदत करेल. आम्ही रामोजी फिल्म सिटी आणि आयआरसीटीसी यांच्या समन्वयाने पर्यटन करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही वेबसाइटवरून रामोजी फिल्म सिटीचे पॅकेज आणि आयआरसीटीसीचे पॅकेज यांचे मार्केटिंग केले जाईल. पर्यटकांसाठी ते खूप फायदेशीर ठरेल. रामोजी फिल्म सिटीसोबत भागीदारी करणे ही सन्मानाची गोष्ट आहे, असे नरसिंगा राव म्हणाले.

RFC Inks Pact with IRCTC
रामोजी फिल्म सिटीने केला IRCTC सोबत करार

रामोजी फिल्म सिटी RFC ही तब्बल 2,000 एकरमध्ये पसरलेली चित्रपट सृष्टी आहे. येथे अनेक आकर्षणे आहेत. त्यामध्ये थीमॅटिक आकर्षणे, मेक बिलीव्ह लोकल, आकर्षक गार्डन्स, कॅस्केडिंग फव्वारे आणि सर्जनशील मनोरंजनासाठी विविध साधने उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे रामोजी फिल्म सिटीला मान्यता मिळालेली आहे.

रामोजी फिल्म सिटी ही अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उत्तम फिल्म सिटी आहे. येथे, सर्वसमावेशक चित्रपटनिर्मितीसाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक सेवा एकत्रितपणे दिल्या जातात. ज्यामुळे संपूर्ण त्रास-मुक्त चित्रपट निर्मितीचा अनुभव चित्रपट निर्मात्यांना येतो. येथील आश्चर्यकारक सुविधा कोणत्याही दिवशी एकाच वेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्यास सक्षम आहे. रामोजी फिल्म सिटीला दरवर्षी किमान १.५ दशलक्ष पर्यटक भेट देतात.

हेही वाचा हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटीची तेलंगाणा पर्यटन पुरस्कारासाठी निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.