ETV Bharat / bharat

Ahmedabad Bomb Blast : गुजरातमध्ये तब्बल 38 दोषींना फाशीची शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय - अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ( Ahmedabad serial bomb blast case ) विशेष न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी 6 जुलै 2008 साली बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये 56 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर, 246 जण गंभीर जखमी झाले होते.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट
Ahmedabad Bomb Blast
author img

By

Published : Feb 18, 2022, 11:51 AM IST

Updated : Feb 18, 2022, 1:07 PM IST

अहमदाबाद - गुजरातसह संपूर्ण देश हादरवून सोडणार्‍या 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Bomb Blast) प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी 6 जुलै 2008 साली बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये 56 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर, 246 जण गंभीर जखमी झाले होते. अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी झालेल्या 21 बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालय त्यांना नेमकी कोणती शिक्षा सुनावतेय, याकडे गुजरातसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीचा बदला घेत दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट केले होते. 70 मिनिटांमध्ये एकापाठोपाठ एक केलेल्या 21 स्फोटांत 56 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, तर 246 लोक गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, इंडियन मुजाहिद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाशी संबंधित दहशतवाद्यांनी हे साखळी बॉम्बस्फोट घडवले होते.

19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना अटक -

या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अहमदाबादला भेट दिली होती. या भेटीनंतर 28 जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकानं अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे स्फोट होऊ शकले नाहीत. तसेच अहमदाबादमधील या स्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या टीमने जयपूर आणि वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

हेही वाचा - Punjab Assembly Elecions 2022 : कुमार विश्वास यांच्या आरोपांवर केजरीवाल गप्प का? राहुल गांधींचा सवाल

Last Updated : Feb 18, 2022, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.