ETV Bharat / bharat

Guntur station: गुंटूर स्टेशनवर रेल कोच रेस्टॉरंट उघडले! खाद्यप्रेमींची चिंता मिटली - गुंटूर स्टेशनवर एक रेल कोच रेस्टॉरंट उघडले

आंध्र प्रदेशच्या गुंटूर रेल्वे विभागाने गुंटूर स्टेशनवर एक रेल कोच रेस्टॉरंट उघडले आहे. हा वातानुकूलित सुधारित रेल्वे कोच खाद्यप्रेमींच्या गरजा पूर्ण करतो. रेस्टॉरंट चोवीस तास स्थानिक दरांमध्ये अन्न पुरवण्याचे काम करणार आहे.

गुंटूर स्टेशनवर रेल कोच रेस्टॉरंट उघडले
गुंटूर स्टेशनवर रेल कोच रेस्टॉरंट उघडले
author img

By

Published : Oct 11, 2022, 8:47 PM IST

गुंटूर (आंध्र प्रदेश) - गुंटूर रेल्वे स्थानक हे लोक आणि प्रवाशांसाठी एक नवीन आकर्षण आहे. स्टेशन परिसरात रेल्वे कोच स्टाइल थीम असलेली रेस्टॉरंट देण्यात आली आहे. गुंटूर विभागाचे डीआरएम आर. मोहनराजाने हे कोच रेस्टॉरंट सुरू केले आहे.

गुंटूर स्टेशनवर एक रेल कोच रेस्टॉरंट उघडले

ते म्हणाले की, दक्षिण मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच गुंटूरमध्ये अशा प्रकारचे रेल कोच रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना एक अनोखा आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी या रेस्टॉरंटची स्थापना करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, जुन्या स्लीपर कोचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे. रेस्टॉरंटच्या गरजेनुसार या कोचचे नूतनीकरण आणि परवाना देण्यात आला आहे. गुंटूर रेल्वे स्थानक परिसरासमोर ते उभारण्यात आले आहे.

या अभिनव कल्पनेमुळे रेल्वे प्रवाशांना पूर्णपणे नवा अनुभव मिळणार असल्याचे मोहनराजा यांनी सांगितले. स्वच्छ वातावरणात विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय खाद्यपदार्थांच्या किमती सर्वांना परवडणाऱ्या असतील. हे रेस्टॉरंट २४ तास खुले असते. 'फूड एक्सप्रेस' नावाचे रेस्टॉरंट खाद्यप्रेमींना अविस्मरणीय अनुभव देईल.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.